कोकण रेल्वे विरोधातल्या आंदोलनाला ऑटो रिक्षा चालक सेनेचा पाठिंबा !

Edited by: विनायक गावस
Published on: November 21, 2023 19:02 PM
views 204  views

सावंतवाडी : कोकण रेल्वेकडून सावंतवाडीकरांवर होणा-या अन्यायाविरुध्द तसेच बंद केलेल्या रेल्वे गाड्यांना सावंतवाडीत थांबा देण्यासह सावंतवाडी रेल्वे टर्मिनस कार्यान्वित करण्यासाठी येत्या २६ जानेवारीला सावंतवाडीकरांच्या मागण्यांसाठी कोकण रेल्वे विरुध्द साखळी आंदोलन करणार असल्याचा इशारा मिहीर मठकर यांनी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी ऑटो रिक्षा चालक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही या साखळी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. पाठिंब्याच पत्र मिहीर मठकर यांच्याकडे त्यांनी सादर केलेय.

सावंतवाडी रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची होणारी गैरसोय तसेच अतिरिक्त रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा अशी मागणी त्यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे या निवेदनाद्वारे केलीय. या मागणीचे निवेदन त्यांनी २६ जानेवारीला कोकण रेल्वेविरुद्ध साखळी आंदोलन छेडणाऱ्या मिहीर मठकर यांच्याकडे सुपूर्द करून या उपोषणाला त्यांनी पाठिंबाही दर्शवला आहे.

यावेळी चौंडू पाटील, धर्मेंद्र सावंत, सुधीर पराडकर, जयवंत टंगसाळी, सदानंद धर्णे, मनोहर मसुरकर, विहांग गोठस्कर आदी उपस्थित होते .