
सिंधुदुर्ग : कोकण रेल्वे मार्गावर धावणारी आणखी एक गाडी आता एलएचबी कोच सहित धावणार आहे. गाडी क्रमांक 16336/16335 नागरकोईल गांधीधाम - नागरकोइल एक्सप्रेस ही गाडी दिनांक 26 नोव्हेंबरपासून एलएचबी कोचसहित चालविण्यात येणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक 16336 नागरकोईल - गांधीधाम एक्सप्रेस दिनांक 26 नोव्हेंबर 2024 च्या फेरीपासून तर गाडी क्रमांक 16335 गांधीधाम - नागरकोइल एक्सप्रेस दिनांक 29 नोव्हेंबर 2024 च्या फेरीपासून एलएचबी कोचसहित चालवण्यात येणार आहे. आतापर्यंत ही गाडी 23 डब्यांची धावत होती मात्र या गाडीचा एक सेकंड स्लीपर डबा करून ती 22 एलएचबी डब्यांची करण्यात आलेली आहे.
या गाडीच्या डब्यांची सुधारित रचना
एकूण : २३ कोच
• टू टियर एसी - 01
• श्री टियर एसी - 05
• स्लीपर - 11
• जनरल - 02
• पँट्री कार - 01
• एसएलआर - 01
• जनरेटर कार - 01
या गाडीला कोकणातील सावंतवाडी, रत्नागिरी आणि चिपळूण आणि माणगाव या स्थानकांवर थांबे आहेत.