कोकण रेल्वे प्रवासी समन्वय - संघर्ष समिती आक्रमक

Edited by:
Published on: June 24, 2024 12:49 PM
views 53  views

सिंधुदुर्गनगरी : कोकणला वरदान ठरणारी कोकण रेल्वे कोकणातून जाऊनही फायदा मात्र गोवा केरळ कर्नाटक व अन्य राज्यांना मिळत आहे अनेक जलद गाड्यांना सिंधुदुर्ग थांबा नाही तिकीट कोठाही बंद केला कोकणातील प्रवाशांना मेंढराप्रमाणे प्रवास करावा लागतो या प्रश्नावर रेल्वे प्रशासनाला जागा देण्यासाठी हे लक्षवेधी निवेदन देण्यात आले असून याबाबत दखल न घेतल्यास १५ ऑगस्ट रोजी उपोषण व त्यानंतर रेल रोको सारखे निर्णय घ्यावे लागतील असा इशारा कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश पावसकर यांनी दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्टेशन समितीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा प्रवासी संघर्ष व समन्वय समितीच्या माध्यमातून अध्यक्ष प्रकाश पावसकर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारीकिशोर तावडे यांना निवेदन देण्यात आले यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते यावेळी सचिव मिर मटकर , सिंधुदुर्ग समितीचे अध्यक्ष शुभम परब, राजन परब, महादेव मटकर  ,नागेश ओरोसकर ,भूषण बांदिवडेकर ,सुहास परब , अजय मयेकर , संजय वालावलकर  ,साई बांदिवडेकर , स्वप्निल गावडे ,सुभाष शिरसाट ,आदींसह उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन  देण्यात आले. 

यावेळी जिल्हाधिकारीकिशोर तावडे यांनी आपले निवेदन रेल्वे बोर्डाकडे पाठविले जाईल असे सांगितले. उद्याच्या पावसाळीअधिवेशनात कोकण रेल्वेच्या प्रश्नाबाबत अन्य राज्यांच्या आमदार खासदाराप्रमाणे कोकणातीलसर्व आमदारांनी एकत्र होऊन रेल्वेचे प्रश्न सोडविण्याबाबत उदया विधानसभेचे पावसाळी अधिवेशन २७ जून पासून सुरू होत आहे  ,सदर अधिवेशनामध्ये कोकणासाठी प्रश्न ठराव मंजूर  करून घ्यावे अशी मागण सिंधुदुर्ग जिल्हा रेल्वे संघर्ष व समन्वय समिती संघटनाव जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्टेशनच्या समित्या च्या वतीने सर्व आमदार,व मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांना, तसेच  विधानसभेच्या सभापतींना केली आहे .

यावेळी करण्यात आलेल्या मागणीमध्ये कोकण रेल्वेचे मध्य रेल्वे मध्ये विलीनीकरण करून घेण्यात यावे ,सावंतवाडी रेल्वे टर्मिनस पूर्ण  त्याला प्राध्यापक मधु दंडवते यांचे नाव देण्यात यावे ,पनवेल रेल्वे टर्मिनस चे काम येत्या गणपती पूर्वी पूर्ण करून त्यांना स. का पाटील यांचे नाव देण्यात यावे कारण पनवेलला त्यांनीच पहिली रेल्वे आणली.परळ टर्मिनसचे काम पूर्ण करून त्या टर्मिनसला चैत्यभूमी टर्मिनस असे नाव देण्यात यावे , वसई वरून सावंतवाडीकरिता रेल्वे बोर्डाकडे स्वतंत्र गाडीची मागणी करणे.कल्याण वरून सावंतवाडी करिता स्वतंत्र गाडीची मागणी करण्यात यावी ,कसाल रेल्वे स्टेशन जे कोकण रेल्वेच्या नकाशात पूर्वी होते अजूनही ते स्टेशन बांधले नाही ते पूर्ण केले जावे.

कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गासाठी स्वतंत्र निधीची व्यवस्था करणे व तातडीने कामाला सुरुवात करणे. ,कोकण रेल्वे मार्गावर दादर ते रत्नागिरी सावंतवाडी मडगाव कोकण कन्या नंतर मुंबईकडे जाणारी व कोकण कन्या आधी मुंबईहून रत्नागिरी सावंतवाडी मडगाव कडे येणारी लोकल रेल्वे ट्रेन सोडावी ,सध्या कोकणातून दक्षिण भारतात सुसाट जाणाऱ्या आणि ज्यांचा प्रवासाचा जवळ जवळ आठ तासाचा वेळ वाचतो त्यातील फक्त अर्धा तास महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांना देऊन सर्व गाड्यांना महाराष्ट्रातील काही स्थानकावर थांबा देण्यात यावा जसे की सी एस टी मेंगलोर सावंतवाडीसाठी मत्स्यगंधा कणकवली साठी तसेच  वैभववाडी असे इतर गाड्यांना थांबे देण्यात यावेत पंधरा गाड्या तर रत्नागिरी नंतर मडगाव पर्यंत कुठेच थांबत नाहीत अशा गाड्यांना रत्नागिरी नंतर सिंधुदुर्ग स्टेशन मध्ये थांबा देण्यात यावा.

सावंतवाडी मडगांव वरून दिव्याला रात्री येणारी गाडी पुन्हा एक-एक उपलब्ध करून रात्री आठ वाजता दिव्यावरून पुन्हा सावंतवाडी मडगांवकरता सोडावी व सावंतवाडी मडगांव ला पोचलेली गाडी गाडी रात्री दिव्या करता रवाना करावी. पुण्यावरून पनवेल मार्गे सावंतवाडी करता स्वतंत्र गाडी सोडण्यात यावी ही गाडी मंजूर झालेली एरणाकुलमला नेलेली आहे.कोकण रेल्वे मार्गावरून थेट बेंगलोर मॅजेस्टिक रेल्वे स्थानक पर्यंत एकही गाडी सुरू नाही ती सुरू करण्यात यावी.

पालघर, मुंबई पासून ते सावंतवाडी पर्यंत जेवढे आमदार निवडून जातात त्या सर्व आमदारांनी या ठरावासाठी पक्ष मतभेद विसरून हे ठराव मंजूर करून घेण्यासाठी सर्व पक्षाच्या आमदारांनी एकत्र येण्याची काळाची गरज आहे कोकण रेल्वेची स्थापना होऊन आता तीस वर्षे होत आहेत आम्ही जेवढे पैसे दिले तेवढे आम्हाला टर्मिनस आणि गाड्या मिळाल्याच पाहिजेत.अशी आग्रही मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे याबाबतचे निवेदन देण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत रेल्वे प्रशासन आणि रेल्वे बोर्ड त्यांचेही लक्ष वेधण्यात आले आहे.