कोकण ऑक्सि मिनरल वाँटर प्रकल्पाचा शुभारंभ

Edited by: मनोज पवार
Published on: March 19, 2025 19:09 PM
views 164  views

मंडणगड :  सोवेली पंचक्रोशी सहकारी औद्योगिक वसाहतीच्या औद्योगिक क्षेत्र शिरगाव येथे विकास इंटरप्रायझेस यांच्या माध्यामतून उभारण्यात आलेल्या कोकण ऑक्सि या मिनरल वाँटर प्रकल्पाचा शुभारंभ 19 मार्च 2025 रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्यातील पहिला मिनरल वाँटर प्रकल्प सुरु झाल्याने येथील नागरिकांना तालुक्यातच तयार झालेले मिनरल वॉटर उपलब्ध होणार आहे.

यानिमित्ताने आयोजीत कार्यक्रमात सोवेली पंचक्रोशी सहकारी औद्योगिक वसाहत मंडणगड या संस्थेचे चेयरमन रमेश दळवी यांनी प्रकल्पास शुभेच्छा देताना मंडणगड तालुक्यात आज उद्योग पर्वाची खऱ्या अर्थाने सुरवात झाली असल्याचे सांगीतले स्थानीक पातळीवर रोजगार निर्मीती होण्याचे  दृष्ठीने तालुक्यात अशा उद्योग प्रकल्पांची गरज आहे, येथील सुशिक्षित तरुणवर्ग रोजगाराकरिता महानगरामध्ये स्थलांतरित झाला आहे. शिवाय अनेक तरुणांना बेकारीचा सामना करवा लागत आहे हा प्रकल्प त्याकरिता मार्गदर्शक ठरेल प्रकल्पांमुळे तालुक्यातील अर्थकारणालाही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे चालना मिळेल. आज सुरु झालेला उद्योग हा छोटा उद्योग असला तरी भविष्यातील तालुक्याचे मोठ्या वाटचालीची ही सुरुवात आहे.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष व  कोकण ऑक्सि प्रकल्पाचे मालक विकास शेट्ये, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस विश्वदास लोखंडे, अँड. राकेश साळुंखे, सरफराज चीपोळकर, विहंग फुड्सचे विरंग पारकर, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक सचिन सनये, उद्योजक संजीव जाधव, इमरान टोकण, दगडू बैकर, संजय सुगदरे, अँड. यश घोसाळकर, यश मेहता आदि मान्यवर उपस्थित होते.