को. म. सा. प. ची सभा २८ ऑक्टोबरला !

Edited by: विनायक गावस
Published on: October 27, 2023 11:02 AM
views 81  views

सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या २८ ऑक्टोबर रोजी  सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आली आहे.

तसेच सभेनंतर सायंकाळी चार ते सहा या वेळेत कोजागरी पौर्णिमेचे औचित्य साधत कोजागरी कवी संमेलन देखील संपन्न होणार आहे. यावेळी कवितांची मैफल रंगणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष ॲड. संतोष सावंत, सचिव प्रा. प्रतिभा चव्हाण, खजिनदार डॉ. दीपक तुपकर आदींनी केले आहे.