कोकण पदवीधर मतदार नोंदणी करण्यास अजूनही २८ मे पर्यंत मुदतवाढ

२६ जूनला मतदान | जिल्हात २५ मतदान केंद्र : जिल्हाधिकारी किशोर तावडे
Edited by:
Published on: May 25, 2024 11:28 AM
views 608  views

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदार संघातील निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक जानेवारी २०२४ रोजी  १७४८४ पदवीधर मतदार नोंदणी झालेली मतदार यादी  प्रसिद्ध झाली आहे. तर ६५७ पदवीधर मतदारांचे अर्ज  ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने दाखल झाले आहेत.  अजूनही पदवीधर मतदारांना नाव नोंदणी करण्याची संधी असून  पात्र असलेल्या पदवीधराने दिनांक  28 मे २०२४ पर्यंत ऑनलाइन किंवा ऑफलाइन नमुना १८ भरून मतदार नोंदणी करू शकतात. २१ मतदान केंद्र असून वाढलेल्या मतदारामुळे आणखी चार केंद्रे वाढवून  एकूण पंचवीस मतदान केंद्राच्या मंजुरीचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आल्याची माहिती  जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी  बालाजी शेवाळे उपस्थित होते.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदार संघातील आमदार श्री निरंजन डावखरे  यांची मुदत ७ जुलै २०२४  रोजी संपणार आहे. या जागेसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 31 मे निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करणे ७ जून  पर्यंत नामनिर्देशन पत्र   सादर करण्याचा अखेरचा दिनांक. 10 जून छाननी, 12 जून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक. 26 जून  सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान,  जुलै रोजी मतमोजणी व पाच जुलै रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक असा हा निवडणूक कार्यक्रम आहे.

मागील निवडणुकीच्या तुलनेत यावर्षीच्या  त मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एक जानेवारी 2024 ला अंतिम करण्यात आलेल्या पदवीधर मतदारांच्या यादीत 17484  पदवीधर मतदारांनी नोंदणी केली आहे. 1  जानेवारी 2024 नंतर ऑफलाइन 106  ११ व १२ मे रोजी घेतलेल्या कॅम्प मध्ये 155  व ऑनलाइन 396  असे एकूण 657 नवीन अर्ज दाखल झाले आहे. 28 मे पर्यंत  रात्री बारा वाजेपर्यंत  पात्र पदवीधर  मतदारांना  ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. तसेच ऑफलाइन नोंदणी करता येईल  असेही जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी सांगितले. 

पूर्वीची 21 मतदान केंद्र असून  कणकवली कुडाळ वेंगुर्ला या ठिकाणी मतदारांची संख्या वाढल्यामुळे  तहसीलदार कार्यालयात असलेल्या या मतदान केंद्रांना सहाय्यक मतदान केंद्र दिले जाणार आहे  त्यामुळे आणखी चार मतदान केंद्रात वाढ होईल व ती एकूण 25 केली जातील व तसा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आल्याचे ही जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी सांगितले.