
सिंधुदुर्गनगरी : कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत सिंधुदुर्ग वासी यांनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल 73.62% एवढे मतदान झाले होते तर पूर्ण कोकणपती पदवीधर मतदारसंघात एकूण 59.31% एवढे मतदान झाले आहे अजून एक तास मतदानासाठी शिल्लक असून या तासाभरात अजून किती मतदान होते हे पहावे लागणार आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आज निवडणूक होत असून सकाळी सात वाजल्यापासून हे मतदान सुरू झाले आहे आज दिवसभर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोराचा पाऊस आहे तरीही जिल्ह्यातील मतदारांनी या मतदानामध्ये आपला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 18 हजार 551 एवढे मतदार आहेत यापैकी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 13658 एवढ्या मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला आहे कोकण पदवीधर मतदार संघात पालघर मध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत 59.17% ठाणे 44.28% रायगड 61.98% रत्नागिरी 63.35% तर सिंधुदुर्ग 73.62 टक्के एवढे मतदान झाले आहे.