भर पावसात मविआ - महायुतीच्या बुथवर कार्यकर्त्यांची गर्दी !

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक
Edited by: विनायक गांवस
Published on: June 26, 2024 11:22 AM
views 177  views

सावंतवाडी : कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठीच्या मतदान प्रक्रियेला बुधवारी सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली. सावंतवाडीतील केंद्रांवर सकाळपासून पदवीधर मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दाखल झाले होते. दुपारनंतर अधिक प्रमाणात मतदान झाले. भर पावसात देखील महाविकास आघाडी व महायुतीच्या बुथवर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. 


सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान प्रक्रिया होणार आहे. महायुतीचे अँड निरंजन डावखरे व महाआघाडीचे रमेश कीर यांच्यात ही थेट लढत होत आहे.  सावंतवाडीत तहसीलदार कार्यालय व जि. प. शाळा नंबर ५ या दोन ठिकाणी मतदान केंद्रे असून सकाळपासूनच मतदारांनी उपस्थिती दर्शविली होती. सावंतवाडी संस्थांचे राजे खेमसावंत उर्फ बाळराजे भोसले, युवराज लखमराजे भोसले, माजी आमदार राजन तेली, राष्ट्रवादीच्या अर्चना घारे-परब, माजी नगराध्यक्ष अँड.दिलीप नार्वेकर आदींसह नेतेमंडळींनी मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या पसंतीचे मत देत मतदान करण्यात आले‌. यंदा २०१९ पूर्वीच्या पदवीधर नव मतदारांनी पहिल्यांदाच मतपत्रिकेवर पहिली पसंती देत मतदानाचा हक्क बजावला. उमेदवारांची संख्या अधिक असल्याने व प्रक्रिया वेगळी असल्याने नव मतदारांत थोडा संभ्रम निर्माण होत होता. उपस्थित निवडून अधिकाऱ्यांकडून याबाबत मार्गदर्शन नव मतदारांना केलं जात होत. प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील हे मतदान केंद्रावर लक्ष ठेवून होते.


 भर पावसात देखील महाविकास आघाडी व महायुतीच्या बुथवर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. मतदान केंद्राबाहेर महायुती व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रत्येक मतदाराला बॅलेट पेपर नुसार नंबर सांगत होते. महायुतीच्या बुथवर माजी आमदार राजन तेली, युवराज लखमराजे भोंसले, माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजप नेते महेश सारंग, माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, भाजपचे शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, अँड. संजू शिरोडकर, दिनेश सारंग, मनोज नाईक, रवींद्र मडगावकर, मोहिनी मडगावकर, अशोक माळकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. तर महाविकास आघाडीच्या बुथवर माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, ज्येष्ठ नेते विकास सावंत, अँड. दिलीप नार्वेकर, राष्ट्रवादीच्या अर्चना घारे-परब, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, महेंद्र सांगेलकर, रुपेश राऊळ, कॉग्रेस शहराध्यक्ष ऍड. राघवेंद्र नार्वेकर, समीर वंजारी, बाळा गावडे, संजय लाड आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.