कोकण पदवीधर ; भाजपकडून निरंजन डावखरेंना पुन्हा संधी ?

Edited by: भरत केसरकर
Published on: May 08, 2024 09:08 AM
views 415  views

सिंधुदुर्ग : कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 10 जूनला होत आहे. या जागेवर सध्या कोकण पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे आमदार निरंजन डावखरे हे प्रतिनिधीत्व करत आहेत. निरंजन डावखरे हे दोन वेळा भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. भाजपकडून निरंजन डावखरे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे असणार असल्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार कोण असणार आहेत ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिला आहे.