मालवणात 60 टक्के मतदान !

कोकण पदवीधर मतदार संघ निवडणुक
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 26, 2024 11:09 AM
views 221  views

मालवण : कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरु आहे. तालुक्यात दुपारी 2  वाजेपर्यंत सरासरी 60 टक्के  मतदान झाले. मालवण तहसील कार्यालय येथे दोन केंद्र आहेत. तर आचरा, मसुरे, कट्टा येथे प्रत्येकी एक अशी 5 मतदान केंद्र तालुक्यात आहेत. मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर यांच्यात थेट लढत होत आहे. दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आपल्या बूथवर ठाण मांडून होते. आज सकाळपासूनच पावसाच्या सरी कोसळत आहेत. तरीही मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करण्यास बाहेर पडले. आज सर्व उमेदवारांचे भवितव्य मे मतपेटीत बंद होणार आहे.