कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर

10 जूनला मतदान ; 13 जूनला मतमोजणी
Edited by: भरत केसरकर
Published on: May 08, 2024 09:04 AM
views 737  views

सिंधुदुर्ग : अखेर कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. 10 जूनला मतदान होणार आहे. तर 13 जूनला मतमोजणी होणार आहे. 22 मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. तर 27 जून पर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.

सध्या कोकण पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे आमदार निरंजन डावखरे हे प्रतिनिधीत्व करत आहेत. निरंजन डावखरे हे दोन वेळा भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. भाजपकडून निरंजन डावखरे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे असणार आहेत. तर इंडिया आघाडीचे उमेदवार कोण असणार आहेत? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिला आहे.