जि. प. माजी विरोधीपक्ष नेते पांडुरंग कोंडसकर यांचे निधन..!

Edited by: भरत केसरकर
Published on: February 14, 2024 05:06 AM
views 102  views

कुडाळ:जनता दलाचे नेते तत्कालीन नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य आणी  जि.प.चे माजी विरोधी पक्षनेते,भाजपचे पांडुरंग भिवा कोंडसकर वय-७२ यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र धक्काने निधन मंगळवारी रात्री दहा वाजता दुःखद निधन झाले. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर कोंडस्करांना रात्री माणगाव वरून उपचारासाठी कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वाटेतच त्यांचे दुःखद निधन झाले. या घटनेने माणगाव खोऱ्यात शोककळा पसरली आहे.तर कट्टर समाजवादी नेता हरपला आहे.

   पांडुरंग कोंडस्कर हे मूळचे माणगावचे. माजी आमदार कै.पुष्पसेन सावंत यांचे कट्टर समर्थ म्हणून ओळखले जात. माणगाव खोऱ्याच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असायचे. आकारीपड जमिन, वनसंज्ञा, टाळांबा प्रकल्प,आजिंवडा घाटमार्ग यास माणगाव खोऱ्यातील अनेक विकासाच्या आंदोलनात ते सक्रिय सहभागी होते. एक अभ्यासू जी.प. सदस्य म्हणून त्यांची नेहमीच सगळ्यांशी त्यांची ओळख होती. आज दुपारी त्यांच्यावर माणगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


*शिक्षण क्षेत्रात भरीव काम*

    माणगाव शिक्षण संस्थेवर संचालक व अध्यक्ष अशा पदावर त्यांनी काम केले होते. कुडाळ हायस्कूलची  शिक्षक वैभव कोंडस्कर यांचे ते वडील होत  पांडुरंग कोंडस्कर हे समाजवादी विचारसरणीचे होते. 1980 ते 90 दशकात जनता दलाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात झंजावत होता. यावेळी 1992 ला त्यांनी माणगाव जिल्हा परिषद निवडणूक लढवली आणि तत्कालीन काँग्रेसचे उमेदवार सगुन धुरी यांना त्यांनी पराभूत केले.जिल्हा परिषदेवर गेल्यावर ते विरोधी पक्ष नेते झाले. काँग्रेसचे जिल्हा परिषदेवर सत्ता आली आणि आर.बी.दळवी अध्यक्ष झाले. अशावेळी पांडुरंग कोंडस्कर यांनी जनतेचे प्रश्न चिकाटी आणि अत्यंत अभ्यासपूर्ण सभागृहात मांडले. एक आक्रमक आणी हुशार विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांची ओळख होती. अभ्यासू  व्यक्तिमत्व असलेल्या कोंडस्कर यांनी सत्ताधाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या सभागृहात सळोकीपळो करून सोडले. त्यावेळी तत्कालीन आमदार कैलासवासी पुष्पासेन सावंत यांचे डीगसला डी.एड.कॉलेज होते.अशावेळी कोंडस्कर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक मुलांना डी.एड साठी डीगस आणी   अन्न कॉलेजला प्रवेश मिळवून देण्यासाठी मोठा वाटा उचलला होता. जिल्हा परिषद सदस्य असताना नेहमी ते कुडाळ येथील पुष्पसेन सावंत यांच्या एस.टी  स्टॅन्ड समोरील कार्यालयात दिवसभर बसून जनतेची काम करण्यात बसलेले असायचे. त्यानंतर 1997 साली त्यांनी पुन्हा जिल्हा परिषद लढवली. परंतु शिवसेनेचे सगुण धुरीनी त्यांचा पराभव केला. या पराभवाने ते डगमगले नाहीत. त्यांनी सहकार व सामाजिक क्षेत्रात आपले कार्य चालू ठेवले. यानंतर 1999 ते 2001 अशा कालावधीत त्यांनी माणगाव  शिक्षण प्रसारक मंडळ माणगाव संचलित श्रीवासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगावचे  अध्यक्ष म्हणून त्याने अतिशय धडाडीने काम पाहिले. त्यानंतर 2003 ते 2022 असे सलग तब्बल 20 वर्ष त्यांनी माणगाव स्कूलचे संचालक म्हणून काम पाहिले. एक धडाडी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा परिचय होता. कैलासवासी मधु दंडवते आणी कै. पुष्पसेन सावंत यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. समाजवादी चळवळीशी नाळ जोडलेल्या कोंडसरानी यानंतर जनता दलाशी काडीमोड करत पुष्पसेन सावंत यांच्यासोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.कै.पुष्पसेन सावंत यांचे राणेशी बिनसले आणी त्यांनी काँग्रेस सोडली आणी ते राष्ट्रवादीत गेले. मात्र कोंडसकर हे काँग्रेसमध्येच नारायण राणे सोबत राहिले. यानंतर नारायण राणे सोबत ते स्वाभिमान पक्षात सुद्धा सक्रिय होते. त्यानंतर नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नारायण राणेंसोबत ते भाजपमध्ये सहभागी झाले होते. नुकत्याच 10 फेब्रुवारीला माणगाव बाजार येथे झालेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ते सक्रिय दिसले होते. नारायण राणे यांनी त्यांचा आपल्या भाषणात एक जुना आणि जाणता कार्यकर्ता म्हणून उल्लेख केला होता. असा सहकार चळवळीतील नेता हरपल्याने माणगाव खऱ्यावर शुककळा पसरली आहे.

   कोणताही वाद असो तो न ताणता मिटवणार नेतृत्व म्हणून त्यांचा परिचय होता.त्यांच्या निधनानंतर माणगाव हायस्कूलचे विद्यमान अध्यक्ष सगुण धुरी,माजी अध्यक्ष काका केसरकर,माजी सीईओ बाळा आगलावे,माजी संचालक बंडया पाडगावकर,माणगाव हायस्कूल मुख्याध्यापक प्रशांत धोंड,उपमुख्याध्यापक संजय पिळणकर,पर्यवेक्षक चंद्रकांत चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.

*1990 च्या दशकातील कै.पांडुरंग कोंडसकर,कै.अजित केसरकर आणी प्रभाकर परब हे गाजलेले त्रिकूट*


    कै.पांडुरंग कोंडसकर,कै. अजित केसरकर आणि प्रभाकर परब  हे 1990 दशकात गाजलेल्या त्रिकूट. खरंतर पांडुरंग कोंडसकर यांची घरची परिस्थिती अतिशय हालाकीची  होती.जनता दलाचे वारे देशभरासह देशभराचा महाराष्ट्राचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाहत होते जनता दल आणि काँग्रेस असे त्यावेळी दोनच पक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रबळ होते अशावेळी 1992 ला पांडुरंग कोंडस्कर यांना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माणगाव मधून तिकीट मिळाले. याचवेळी माणगाव पंचायत समितीचे तिकीट जनता दलाने प्रभाकर यांना दिले. तर याच जिल्हा परिषद मतदार संघातील हळदीचे नेरूळ पंचायत समितीचे तिकीट कैलासवासी अजित केसरकर यांना मिळाले. राजकारणातील समाजवादी विचारसरणीचे हे त्रिकूट त्यावेळी तिने जागावर निवडून आले. पांडुरंग कोंडसकरांनी आपले मित्र असलेले काँग्रेसचे सगुण धुरी यांचा पराभव करून जिल्हा परिषदेवर एन्ट्री केली. तर हळदीचे नेरूर पंचायत समिती मतदार संघातून कै.अजित केसरकर यांनी आपले सख्खे भाऊ बाळा केसरकर यांचा पराभव करत विजय मिळवला. तर माणगाव पंचायत समितीवर प्रभाकर परब यांनी काँग्रेसच्या मनोहर साटम यांचा पराभव करत पंचायत समितीवर एन्ट्री केली. खरंतर राजकारणामध्ये ही त्रिकूट त्यावेळी अतिशय प्रसिद्ध होते. कै.अजित केसरकर आणि प्रभाकर परब यांचे आर्थिक पाठबळ आणि पांडुरंग कोंडसकर यांची राजकारणातील हुशारी आणि अमोघ वक्तृत्व यामुळे अवघ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे त्रिकूट चांगलेच चर्चत होते.कोंडसकर यांची ओळख कानाकोपऱ्यात पोचली होती. माणगाव खोरात त्यावेळी जनता दलाचा वर्चस्व होत. यावेळी शिवसेनेचा चंचु प्रवेश सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत होता. यावेळी बबन साळगावकर यांचं प्रस्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने सुरू झालं होतं. बबन साळगावकर माणगाव खोऱ्यात शिवसेनेचे हात पाय पसरू लागले होते.  मात्र बबन  साळगावकर हे शिवसेनेत जरी असले तरी या त्रिकूटांचे चांगले मित्र होते. विरोधीपक्ष कसा असावा ह?याचं उत्तम उदाहरण त्यावेळी कै.पांडुरंग कोंडसकर,कै.अजित केसरकर,प्रभाकर परब आणि बबन साळगावकर यांच्या मैत्रीवरून आजही लक्षात येतं.  तत्कालीन जनता दलाचे नेते देशाचे माजी अर्थमंत्री कैलासवासी मधु दंडवते, कै.आमदार पुष्पसेन सावंत, जयप्रकाश चमणकर, वसंत केसरकर, प्रकाश नेरुरकर,कमलताई परूळेकर,कै.प्रभाकर भोगटे,बंड्या पाडगावकर,कै.बाली किनळेकर,कै.जयानंद मठकर,पी.जे.फर्नांडिस,लाॅरेन्स मान्येकर,माजी सभापती दिपक नाईक,फोंडयाचे कै.बापू नेरूरकर यांच्या समवेत कै.पांडुरंग कोंडसकर आपले काम अतिशय जोमाने चालवले होते.1997 मध्ये सगुण धुरीनी त्यांचा जि.प.च्या निवडणुकीत माणगाव जि.प. मतदार संघातून पराभव केला.यानंतर २००१ मध्य  त्यांनी साळगाव जिल्ह परिषद मतदार संघातून निवडणूक लढवली पण शिवसेनेच्या दिनेश साळगावकर यांनी त्यांचा पराभव केला.


*माणगाव हायस्कूलच्या उभारणीत मोठा वाटा: शिक्षणक्षेत्रात मोठी कामगिरी*


     खरतर कै.पांडुरंग कोंडसकर यांनी शिक्षण क्षेत्रात मोठी कामगिरी केली.1999 ते 2001 अशा कालावधीत त्यांनी माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ माणगाव संचलित श्रीवासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव चे अध्यक्ष पद भूषविले.तर 2003 ते 2022 असे तब्बल 20 वर्षे ते संचालक होते.माणगाव खोऱ्यातील व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक मुलांना नोकरीस लावण्यास त्यांचा मोलाचा वाटा होता.माणगाव हायस्कूल च्या आर्थिक मदतीसाठी त्यांनी प्रसंगी चेहराला रंग फासून रंगभूमीवर अनेक नाटके केली.यातून भरीव निधी शाळेला त्यांनी मिळवून दिला.यासाठी त्यांनी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष्य दिले नाही.कोणत्याही विषयावर तासनतास बोलण्यात त्यांचा हातखंडा होता.माणगाव हायस्कूल व संस्थेच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता.कुठलाही प्रश्न अत्यंत अभ्यासपूर्ण आणी सामंजस्यपणे सोडवण्यात त्यांचा हातखंडा होता.कै.पांडुरंग कोंडसकर,आबा केसरकर,विद्यमान अध्यक्ष सगुण धुरी,एम.डी.चव्हाण,बंड्या पाडगावकर,काका केसरकर,बाळा आगलावे,रमाकांत तामाणेकर,कै.मिलिंद भोसले,कै.सुभानराव भोसले,सुभाष भिसे,वि.न.आकेरकर,मकानदार सर,मनोहर साटम,जोसेफ डाॅन्टस,शंशाक पाडगावकर,कै.शानी नार्वेकर,एकनाथ केसरकर,बाली नानचे,दत्ता शिरसाट,का.हू.शेख,कै.दादा बांदेलकर,कै.आपा नानचे,बाबू नार्वेकर,कै.ज.वि.पिळणकर यांच्या समवेत संस्थेत व शिक्षण क्षेत्रात काम केले. 

  त्यांच्या निधनाने माणगाव खोऱ्यावर शोककळा पसरली आहे.थोड्याच वेळात माणगाव घरी येथे त्यांचा मृतदेह आणला जाणार आहे.तर माणगाव येथील त्यांच्या राहत्या घराशेजारील मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

     माणगाव हायस्कूल मध्ये आज सकाळ सत्रातील उच्च माध्यमिक विभागातर्फे संस्था,शाळा,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी आणी विद्यार्थी यांनी कै.पांडुरंग कोंडसकर यांना श्रद्धांजली देवून शाळा सोडण्यात आली.