कोलझर पशुवैदयकीय दवाखान्याची ईमारत मोजतेय अखेरची घटका...!

Edited by: संदीप देसाई
Published on: July 01, 2023 18:54 PM
views 122  views

दोडामार्ग  : दोडामार्ग तालुक्यातील कोलझर येथे १७ गावांसाठी असलेल्या पशुवैदयकीय दवाखान्याची ईमारत अखेरची घटका मोजते आहे. या इमारतीच्या छप्परावर सिमेंटचे पत्रे तुटल्याने इमारतीला गळती लागली आहे.

उन्हाळ्यात पत्र्यावर माकडांचा उपद्रव असल्याने तेथील पत्रे फुटले आहे.  सध्या पाऊस पडत असल्याने पावसाचे पाणी इमारतीत कोसळत असल्याने दवाखान्याचे घोंगडं भिजत आहे. तसेच या इमारतीचा मुख्य दरवाजा व खिडक्याचे दरवाजे ही जीर्ण झालेले आहेत. भर उन्हाळा गेला आता पावसाळा सुरु झाला.  त्यामुळे आता तरी झोपी गेलेला विभाग आता तरी जागा होईल का? हाच खरा प्रश्न आहे.