गैरसोय टळली ; कोलगावात ट्रान्स्फॉर्मरचे भुमिपूजन

Edited by: विनायक गांवस
Published on: May 19, 2023 17:38 PM
views 197  views

सावंतवाडी : कोलगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कोलगाव कुंभारवाडी येथिल लोकांना बरीच वर्ष कमी व्होल्टेजमुळे कमी दाबाने विद्युत पुरवठा, विद्युत पंप न चालणे, उपकरणांची हानी या गोष्टीना तोंड द्यावे लागत होते. सिंधुदुर्ग जिल्हा बॅक संचालक महेश सारंग यांच्या परिश्रमातून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोलगाव कुंभारवाडी येथे विद्युत ट्रान्सफार्मर रू पंधरा लाख बसविण्याचे काम मंजुर केले. त्या कामाचे भुमीपुजन 18 मे रोजी बुध अध्यक्ष अक्षय वेगुर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक महेश सारंग, कोलगाव सरपंच संतोष राऊळ, उपसरपंच दिनेश सारंग, ग्रामपंचायत सदस्य संदिप हळदणकर संयोगिता उगवेकर आत्माराम चव्हाण व ग्रामस्थ मोठ्या संख्येन उपस्थित होते.