ज्येष्ठ महिलांसाठी 'आरोग्यदायी जीवनशैली' उपक्रम

कोलगाव 'निरामय विकास' चं आयोजन
Edited by: जुईली पांगम
Published on: December 16, 2023 20:30 PM
views 75  views

सावंतवाडी : कोलगाव येथील चव्हाटा वाडीतील विजया राऊत यांच्या अंगणात ज्येष्ठ महिला नागरिकांसाठी यासंबंधीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी डॉ.विद्या हिर्लेकर, पी.एच. डी.आयुर्वेद यांनी सुमारे तासभर मार्गदर्शन केले.

आयुर्वेदानुसार स्वस्थ आरोग्यासाठी  आहार ,विहार, व्यायाम योग्य प्रकारे करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. आज यातील पहिला भाग म्हणजे आहार याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. आहारात अन्न व पाणी कोणते, कसे, किती आणि कधी घ्यावे ? याविषयी सांगितले. तसेच ऋतूनुसार आहाराचे महत्व समजावून सांगितले. 

त्यानंतर उपस्थितांनी आपले आरोग्यविषयक प्रश्न सांगितले. त्यानुसार पुढील महिन्याच्या कार्यक्रमात हात,पाय,कंबर दुखी याविषयी मार्गदर्शन करण्याचे ठरले आहे.

या कार्यक्रमासाठी 18 स्त्रिया उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन वाडीत केल्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले. तसेच पुढील कार्यक्रमाला नक्की हजर राहू असे आश्वासनही दिले.