
सावंतवाडी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर सहा भटवाडी शाळेत एक दिवस बळीराजासाठी म्हणजेच बांधावरची शाळा हा उपक्रम साजरा करण्यात आला. माजी नगरसेविका दिपाली दिलीप भालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कै लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय आदर्श पुरस्कार शाळेने हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला.
भटवाडीतील शेतकरी मोहन गावडे यांच्या शेतात सर्व विद्यार्थी शिक्षक पालक शाळा व्यवस्थापन समिती यांच्यासह हा उपक्रम राबविण्यात आला. भात रोप ( तरवा ) काढणे नांगरणी, भात रोप लावणी, शेतकऱ्याची मुलाखत,बळीराजाचा सत्कार आणि स्नेहभोजन अशा विविध कृतीतून आजचा दिवस आनंदात साजरा करण्यात आला.
यावेळी दिलीप भालेकर यांच्या हस्ते बळीराजा श्री व सौ मोहन गावडे श्री व सौ उमेश गावडे , श्री व सौ देवू गावडे आणि कुटुंबीय यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेविका दिपाली भालेकर, शाळेच्या अध्यक्षा समीक्षा खोचरे, उपाध्यक्ष पूनम तुयेकर, दिलीप भालेकर, गुरुप्रसाद तेजम, जानवी वारीक, अश्विनी गावडे, दीपा गावडे, शाळेचे मुख्याध्यापक केशव जाधव, सहाय्यक शिक्षिका सायली लांबर, मेधा गावडे, बालवाडी शिक्षिका सौ गावडे बाई तेजस गावडे व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.