
देवगड : १ जुलै माजी मुख्यमंत्री व हरीत क्रांतीचे प्रणेते कै .वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त कृषी दिन पंचायत समिती देवगड ,तालुका कृषी कार्यालय व ग्रामपंचायत फणसगांव यांच्या संयुक्त विदयमाने जि.प. केंद्र शाळा पांडुरंग स्कूल फणसगांव शाळेत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने व माजी मुख्यमंत्री व हरीत क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन पंचायत समिती देवगड सहाय्यक गटविकास अधिकारी दिगंबर खराडे व फणसगांव सरपंच शितल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी विठ्ठलादेवी सरपंच ज्योती नारकर, फणसगांव उपसरपंच भुषण नरसाळे, उपनिरीक्षक विजयदुर्ग दशरथ चव्हाण , कृषी उद्यानवेता, रामेश्वर फळ संशोधन केंद्राचे डॉ. अजय मुंज, विस्तारअधिकारी अभिजित मदने, तालुका कृषी अधिकारी आरती पाटील, विस्तार अधिकारी ग्रा.प दीपक तेंडुलकर, विस्तार अधिकारी कृषी लक्ष्मीकांत जोशी, कृषी अधिकारी विलास कोलते, पोलीस पाटील अविनाश पाटील, ग्रामपंचायत अधिकारी विवेक नर, ग्रा.प.सदस्य कृष्णकांत आडीवरेकर, सुजाता पेंडुरकर, अनुराधा नरसाळे, गोवळ गावचे प्रगतशिल शेतकरी नासीर सोलकर, मंडळ कृषी अधिकारी डॉ . बि. एम . लांबाडे, शिरगांव सहा. कृषी अधिकारी मंगेश घनमोडे, सुनिल तेली, समन्वयक दिपीका रावराणे, कोमल शिंगणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना सहाय्यक गटविकास अधिकारी दिगंबर खराडे म्हणाले की तालुका कृषी व पंचायत समिती देवगड कृषी विभागामार्फत असलेल्या योजनांचा लाभ घेऊन शाश्वत उत्पन्न वाढवा तसेच आंबा, काजु लागवड सोबत बांबु लागवड ही मोठया प्रमाणात करा असे आवाहन केले .
यावेळी कृषी उद्दानवेता डॉ़ . अजय मुंज यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की शेतीचे उत्पादन तसेच आंबा बागायतदारांचे उत्पादन वाढवण्यासाठी किटकानाशके व खताचा सुक्ष्म नियोजन करून वापर करा असे आवाहन केले . तसेच तालुका कृषी अधिकारी आरती पाटील यांनी शेतकरी ओळखकार्ड काढण्याचे आवाहन केले .
या कार्यशाळेत कृषी विभागाच्या विविध योजना, भात लागवडीच्या विविध पद्धती, भातलागवड तंत्रज्ञान, फळबाग लागवड योजना, पीएम किसान योजना, पीक विमा योजना याविषयी सखोल मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी आरती पाटील , पंचायत समिती देवगड सहाय्यक गटविकास अधिकारी दिगंबर खराडे, कृषी उद्दानवेता डॉ़. अजय मुंज यांनी मार्गदर्शन केले. तसेच ड्रायफुड बाबत मार्गदर्शन गोवळ गावचे प्रगतशिल शेतकरी नासीर सोलकर यांनी केले . त्यानंतर फणसगांव उपसरपंच भुषण नरसाळे यांनी शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला ग्रामस्थ, शेतकरी, सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते. दुपारच्या सत्रात शाळेच्या परीसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रस्तावना लक्ष्मीकांत जोशी , स्वागत अभिजित मदने तर आभार दिगंबर खराडे यांनी मानले.