
कणकवली : श्री देव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळ, नांदगांव, नांदगाव पंचक्रोशी माध्यमिक शिक्षण संस्था, नांदगाव, सरस्वती हायस्कूल, नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंतांचा सत्कार शुक्रवार दि. २७ जून २०२५ रोजी सकाळी १०.३० वा. आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडी प्रा. संजिवनी पाटील, नाट्य-चित्रपट अभिनेते गणेश रेवडेकर व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी एस.एस.सी. परीक्षेत सिंधुदुर्गातील पहिल्या ३ क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व सरस्वती हायस्कूल, नांदगाव मधील पहिल्या ३ क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला नांदगाव पंचक्रोशीतील पालक, विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री देव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळ, नांदगाव, अध्यक्ष नागेश मोर्ये, मुख्याध्यापक सुधीर तांबे यांनी केले आहे.