
दोडामार्ग : दोडामार्ग तालुका पत्रकार सामितीचे २०२४-२५ चे पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. पत्रकार समितीचा उदयोन्मुख पत्रकार पुरस्कार कोकणसादचे दोडामार्ग प्रतिनिधी लवू परब यांना तर उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रभाकर धुरी यांना जाहीर करण्यात आला. पुरस्काराचे वितरण फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. लवू परब गेली 12 वर्षे पत्रकारितेत आहेत.
श्री सिद्धिविनायक मंदिरात अध्यक्ष संदीप देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक झाली. यावेळी सचिव गणपत डांगी, खजिनदार रत्नदीप गवस, प्रभाकर धुरी, तेजस देसाई, वैभव साळकर, लखू खरवत, संदेश देसाई, समीर ठाकूर, लवू परब आदी उपस्थित होते. यावेळी यशस्वी उद्योजक पुरस्कार २०२४ राजू भोसले, (दोडामार्ग) आणि बाबा टोपले (भेडशी) यांना तर उत्कृष्ट प्रशासकीय सेवा पुरस्कार २०२४ सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता अनिल बडे यांना जाहीर करण्यात आला.
समितीच्या आजच्या बैठकीत लवू परब व प्रभाकर धुरी यांच्या नावांना सर्वानुमते संमती देण्यात आली. यावेळी ओरोस येथे बुधवारी (ता.२९) होणाऱ्या पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले.