
सावंतवाडी: कोकणातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा हा एक कळीचा मुद्दा ठरत असून त्यासाठी आम्ही माध्यमिक स्तरापासूनच स्पर्धा परीक्षा व त्याविषयी जनजागृती विद्यार्थ्यांमध्ये होण्यासाठी पुढील काळात आम्ही नियोजन करू असे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे शालेय समिती अध्यक्ष अमोल सावंत यांनी, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र आयोजित 'स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व समुपदेशन' कार्यक्रमातअध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना सांगितले.
या संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे तसेच मोहन होडावडेकर, आणि वाल्मिक बेलसरे, . मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर उपप्राचार्या डॉ सुमेधा नाईक आणि इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते .कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग जिल्ह्याचे समन्वयक तसेच अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.ॲड. नकुल पार्सेकर यांच्या प्रस्ताविकाने झाले. तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले वक्ते वाल्मिक बिलसोरे यांनी महाराष्ट्र राज्यात इयत्ता दहावी व बारावीचा सर्वात गुणवत्तापूर्ण निकाल हा कोकण बोर्डाचा असतो. तरीही स्पर्धा परीक्षांच्या गुणवत्ता यादीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची नावे दिसत नाहीत याची कारण मीमांसा करत व स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अभ्यासाचे शिस्तबद्ध नियोजन कसे करावे या अनुषंगाने कमी वेळात प्रेरणादायी असे मार्गदर्शन केले.
दुसरे मार्गदर्शक वक्ते मोहन होडावडेकर यांनी होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्याचा हेतू आणि संकल्प विशद करताना सांगितले की, विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते हे निदर्शनास आल्याने त्यातला थोडासा मदतीचा खारीचा वाटा उचलावा म्हणून आम्ही 'जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत संस्थापक अध्यक्ष मा.निलेश साबळे यांच्या दातृत्वाखाली हे कार्य करत आहोत. विद्यार्थ्यांनी ह्या वहयांचा सदुपयोग करावा असेही त्यांनी सांगितले .कार्यक्रमाच्या शेवटी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रत्येक विद्यार्थीला तीन वह्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे संचालक प्रा. सतीश बागवे, अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष नकुल पार्सेकर, मार्गदर्शक वाल्मिक बिलसरे,मोहन होडावडेकर, तसेच इतर मान्यवर प्रशांत सावंत, श्रीमती अर्पिता वाटवे, प्रशालेचे मुख्याध्यापक श्रीमती संप्रवी कशाळीकर ,उपमुख्याध्यापक संजय पाटील, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, सांस्कृतिक कमिटी प्रमुख प्रा.डॉ संजना ओटवणेकर, प्रसिद्धी कमिटी प्रमुख प्रा. संतोष पाथरवट, सांस्कृतिक कमिटी सदस्य प्रा. वामन ठाकूर, प्रा.जोसेफ डिसिल्वा, महाश्वेता कुबल, प्रा. विनिता घोरपडे,प्रा. सविता माळगे,प्रा.डाॅ.अजेय कामत,प्रा.रणजीत राऊळ, प्रा.पवन वनवे ,प्रा.दशरथ सांगळे, प्रा.माया नाईक,प्रा.सृहा टोपले,प्रा.निलेश कळगुंटकर , प्रा. राहुल कदम इ. सर्व प्राध्यापक, सर्व शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जोसेफ डिसिल्वा. यांनी केले तर आभार प्रा.संतोष पाथरवट यांनी मानले.