
वैभववाडी : सडूरे गावठणवाडी येथील रत्नप्रभा विनायक रावराणे, वय ९० यांचे वृद्धपकाळाने राहत्या घरी निधन झाले. सडूरे गावचे माजी सरपंच विजय रावराणे यांच्या त्या आई होत. तसेच माजी सरपंच अंकिता अरुण रावराणे यांच्या त्या सासू होत.
त्यांच्या पश्चात चार मुलगे, दोन विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परीवार आहे.