
सावंतवाडी : खाशे धैर्यशील उर्फ कवू पाटणकर (वय ६५, रा.आकेरी) यांचे मंगळवारी सकाळी दुःखद निधन झाले. आकेरी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गेले काही दिवस ते आजारी होते. मंगळवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, मुलगा असा परिवार आहे. युवा रक्तदाता संघटनेचे खजिनदार अनिकेत पाटणकर यांचे ते वडील होत.