
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्या अभ्यासूवृत्तीने जि. प. सिंधुदुर्ग मध्ये नवा अध्याय लीहिणारे, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांसह राजकारणातील अनेक सन्मानीय व्यक्तींच्या खास मार्जितले असणारे माजी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव हे बोधिसत्व, भारत भूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती सोहळ्यांत थेट नांदेड येथे संबोधित करणार आहेत.
जि. प. सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर अंकुश जाधव यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही, कायम आपल्या अभ्यासू वृत्तीने त्यांनी विविध राजकीय पदे पादाक्रांत केली. प्रथम कोनाळ सारख्या जि. प. मतदार संघातून ते निवडून आले. त्यांच्या कामाचा धडाका आणि त्यांची मेहनत पाहता पाकमंत्री नितेश राणे यांच्या ते खास मर्जीतले म्हणून गणले जावू लागले, यातूनच जन्मभूमी दोडामार्ग तालुका असला तरी आपल्या राजकीय जीवनाची पुढची इनिंग ते ओरोस या जिल्हा मुख्यालयाच्या मतदार संघातून खेळले व तेथून विजय संपादन करत ते पुन्हा समाजाकल्याण सभापदी निवडून आले. त्यांची कारकीर्द नेहमीच अभ्यासू राहिली आहे, त्याचं जोरावर अनेक विकासकामे त्यांनी लिलया पूर्ण केली, सभागृहात त्यांचा दरारा कायम पहावयांस मिळाला, अंकुश जाधव एखाद्या मुद्दा्यावर बोलणार म्हणजे त्या विषयी सरकारी अधिकारी आधीच टरकून असायचे.
त्यांच्या याचं अभ्यासू वृत्तीची दखला घेवून रिजनल वर्कशॉप, नांदेडच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब यांच्या विषयी विचार प्रकट करण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून खास आमंत्रित करण्यात आले आहे, सदरचा कार्यक्रम १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब जनशताब्दी मैदान नांदेड येथे होणार आहे, या निमित्त दोडामार्गची तोफ थेट नांदेडला धडाडणार आहे.