
सावंतवाडी : नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती झालेल्या अश्विनी पाटील यांनी आपला पदभार स्वीकारला आहे. तत्कालीन मुख्याधिकारी सागर साळुंखे यांची पालकमंत्र्यांचे ओएसडी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्या ठिकाणी प्रभारी अधिकारी म्हणून वेंगुल्याचे मुख्याधिकारी पारितोषिक कंकाळ यांना नियुक्ती देण्यात आली होती. दरम्यान, अश्विनी पाटील यांची मुख्याधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी कार्यभार स्वीकारला आहे.
त्यांचे युवा सेनेकडून स्वागत करण्यात आले. यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, युवा सेना तालुका प्रमुख प्रतिक बांदेकर, विधानसभा अध्यक्ष अर्चित पोकळे, सातुळी उपसरपंच स्वप्निल परब, वर्धन पोकळे,साईश वाडकर, संकल्प धारगळकर,मेहर पडते, प्रथमेश प्रभू ,विनायक प्रभुझांट्ये ,मिलिंद देसाई ,चेतन गावडे, अनिकेत पाटणकर, सौरभ मठकर आदी उपस्थित होते.