
सिंधुदुर्गनगरी : श्री ब्राह्मण देव सेवा समिती सुकळवाड अध्यक्ष पदी बाबुराव मसुरकर तर सचिव पदी संतोष पाताडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. श्री ब्राह्मण देव सेवा समितीची पदाधिकारी निवडी बाबत सेवा समितीच्या कार्यकारिणीची सभा अध्यक्ष अनिल पालकर यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली.
या बैठकीत सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी बाबुराव मसुरकर यांची अध्यक्षपदी तर संतोष पाताडे यांची सरचिटणीस पदी निवड करण्यात आली. तसेच नूतन कार्यकारणी मध्ये उपाध्यक्ष पदी प्रल्हाद वायंगणकर,खजिनदार- गणपत हिंदळेकर, सहसचिव नागेश पाताडे, कार्यकारिणी सदस्य म्हणून अनिल पालकर, किशोर पेडणेकर, विलास मसुरकर, रुपेश गरुड याची निवड करण्यात आली. यावेळी बोलताना सुकळवाड गावातील न्यासाच्या सर्व सभासदांना सोबत घेऊन सर्वाना अभिप्रेत असणारे आदर्शवत काम व ब्राह्मण देवाचे सर्व उत्सव दिमाखात पार पाडले जातील. अशी ग्वाही नूतन अध्यक्ष व सचिव यांनी दिले. सर्व स्तरातून नूतन कार्यकारणीचे अभिनंदन करण्यात येत आहे.