
दोडामार्ग : नुकताच दोडामार्ग तालुक्यातील कुडासे या गावी त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांचा 127 वा जयंती कार्यक्रम विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती दोडामार्ग व कुडासे गावातील स्थानिक महिला बचत गट यांच्या सयुंक्त विद्येमनाने उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी समितीचे सल्लागार आयु. गणपत जाधव, आयु. दीपक जाधव, माजी अध्यक्ष आयु. विजय जाधव, आयु. भगवान जाधव, खजिनदार आयु. सुरेश जाधव, सह खजिनदार आयु. महेश जाधव, महिला गटाच्या अध्यक्षा सौ. राधिका पिळगावकर, सौ. विदिशा विजय जाधव, सौ. सरिता रवी जाधव, केतन पिळगावकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी शालेय विध्यार्थ्यानी मान्यवरांचे स्वागत गीताने स्वागत केले. तर छोट्या मुलांनी माता रमाई यांच्या जीवनावर मनोगते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तर प्रमुख मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करताना महापुरुषांचा विचार नव्या पिढी पर्यंत पोहचविण्याचा निर्धार व्यक्त करत, माता रमाई यांच्या संघर्षमय त्यागाला उजाळा दिला. समितीच्या वतीने प्रत्येक महापुरुषांचा जयंती कार्यक्रम गावागावात घेण्याचा संकल्प असून, त्याचा एक भाग म्हणून या वर्षी हा कार्यक्रम कुडासे गावात साजरा करण्यात आला. येणाऱ्या काळात या समितीच्या वतीने समाजावरील अन्यायकारक प्रश्नाबाबत समाजात जनजागृती करून प्रसंगी आंदोलन करण्याचा निश्चय व्यक्त करण्यात आला. तालुक्यातील आंबेडकरी जनतेचा जिव्हाळ्याचा कित्येक वर्ष प्रलंबित असणाऱ्या आंबेडकर भवन प्रश्न मार्गी लावण्याकरिता लवकरच जन आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी गणपत जाधव, दीपक जाधव, सुरेश जाधव, महेश जाधव, भगवान जाधव राधिका पिळगावकर, यांनी विचार मांडले, कार्यक्रमाचे सूत्र संचालन आयु. विजय जाधव यांनी तर आभार प्रदर्शन लाडू पिळगावकर यांनी केले. या कार्यक्रमास मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या.