रेल्वे प्रवासी संघटनेच्या उपोषणाला काँग्रेसचा पाठिंबा !

केतनकुमार गावडे यांची माहिती
Edited by: दिपेश परब
Published on: January 25, 2024 11:33 AM
views 115  views

वेंगुर्ले : सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस व्हावे म्हणून उद्या २६ जानेवारी रोजी मळगाव रेल्वे स्थानकावर प्रवासी संघटनेच्या माध्यमातून उपोषण छेडले जात आहे. त्या आंदोलनाला जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा आहे अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख व जिल्हा काँग्रेस सचिव केतनकुमार गावडे यांनी दिली.

  सदर सावंतवाडी टर्मिनस चा प्रश्न गेली कित्येक वर्षे प्रलंबित आहे. आजच्या परिस्थिती नुसार पाहायला गेलं तर जवळपास ५३ गाड्या कोकण रेल्वे मार्ग जातात परंतु फक्त १३-१४ गाड्यांना ह्या ठिकाणी थांबा आहे. जर टर्मिनस चा प्रश्न सुटला तर आजूबाजूच्या बऱ्याच गावांना ह्याचा फायदा होणार असून एक वेगळं स्थान ह्या स्टेशनला प्राप्त होणार. याचबरोबर येथील स्थानिक जनतेला मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.

   येथील स्थानिक पदाधिकारी तसेच विद्यमान आमदार यांनी जनतेची घोर फसवणूक केली आहे. सदर टर्मिनस चा प्रश्न कायम झुलवत ठेवला आहे. प्रत्येक निवडणूकीला टर्मिनस चा प्रश्न समोर आणून जनतेची फसवणूक केली जात आहे.