कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या उपोषणात सहभागी व्हा : सागर नाणोसकर

Edited by: विनायक गांवस
Published on: January 25, 2024 06:56 AM
views 76  views

सावंतवाडी : कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या माध्यमातून  26 जानेवारी 2024 सकाळी 10 वाजता सावंतवाडी टर्मिनस आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण होत आहे. रेल्वे स्थानक येथील लाक्षणिक उपोषणाला सर्व नागरिकांनी, विविध संस्था, संघटना, व्यापारी संघटना, रिक्षाचालक संघटना, वकिल - डॉक्टर संघटना तसेच कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवासी बांधव भगिनी आणि युवकांनी सहभागी होऊन पाठिंबा द्यावा असं आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीचे उपाध्यक्ष सागर सोमकांत नाणोसकर यांनी केल आहे.