देवगड : येथील देवगड एज्युकेशन बोर्ड, मुंबई संचलित मिलिंद सदानंद पवार पूर्व प्राथमिक शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे इयत्ता पहिली ते चौथीच्या कोणत्याही विषयावर उपयुक्त असे शैक्षणिक साहित्य शिक्षकांनी तयार करावयाचे आहे यापूर्वी कोणत्याही स्पर्धेत सादर न केलेले साहित्य स्पर्धेसाठी पाठवावे तसेच थर्माकोल पासून तयार केलेले साहित्य सादर करू नये. हे साहित्य अल्प खर्चिक असावे तसेच ते टिकाऊ असावे सदर साहित्याची निर्मिती शिक्षकांनी स्वतः करावयाची आहे.
या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक २००० हजार रुपये व प्रशस्तीपत्र द्वितीय क्रमांक १५०० रुपये व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक १००० रुपये व प्रमाणपत्र अशी पारितोषिके असणार आहेत. त्याशिवायपरीक्षकांच्या निर्णयानुसार उत्तेजनार्थ ही पारितोषिके देण्यात येतील तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येतील ही स्पर्धा गुरुदक्षिणा प्रेक्षागृह, शेठ म ग हायस्कूल देवगड या ठिकाणी शनिवार दि. ३० नोव्हेंबर २४ रोजी स९ वा घेण्यात येईल परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक असेल स्पर्धा संपल्यानंतर स्पर्धकांनी आपले शैक्षणिक साहित्य संस्थेला देऊन सहकार्य करावे.
तरी अधिक माहितीसाठी मुख्याध्यापक महादेव घोलराखे (९४२०८२३४१३) मि स पवार प्राथमिक शाळा देवगड यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन रौप्य महोत्सवी समितीचे अध्यक्ष सदानंद पवार तसेच कार्यकारिणीने केलेले आहे..