मतदारांनी मतदानाचा हक्क प्रामाणिकपणे बजवावा : रवी जाधव

Edited by: विनायक गांवस
Published on: October 29, 2024 14:19 PM
views 167  views

सावंतवाडी : विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजतातच पक्षाच्या उमेदवारांनी  जोरदार शक्ती प्रदर्शन करून उमेदवार फॉर्म भरले. सर्वप्रथम सर्व उमेदवारांना व मतदार राजाला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून दीपावलीच्या व निवडणुकीच्या शुभेच्छा. कुठलाही उमेदवार हा चांगलाच असतो. परंतु त्याच्या विकासकामाची पोचपावती येत्या 23 नोव्हेंबरला मतदार राजाच्या मतपेटीतून मिळणारच आहे. तेव्हा कुठच्या पक्षाचा उमेदवार आपल्या यशाची दिवाळी साजरी करणार आहे हे आपल्याला दिसेलच असं मत सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी व्यक्त केले.

 ते म्हणाले, एकीकडे परतीच्या पावसाच्या भीतीने भात कापणी जोरदार चालू आहे त्यासाठी माणसे  मिळणे कठीण झाले आहे परंतु आपापल्या उज्वल भविष्याचा विचार करून शहरी व ग्रामीण भागातील जनता आपापल्या उमेदवारांच्या सभेसाठी खास करून महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक, तरुण-तरुणी तसेच मोठ्या संख्येने युवावर्गची तोबा गर्दी शहरात पाहायला मिळत आहे. ही सर्व मंडळी आपल्या जीवाची तमा न बाळगता कडक उन्हामध्ये तर भर पावसामध्ये उभे राहून आपल्या उमेदवाराला सपोर्ट करून आपल्या उमेदवाराचा उदो उदो करत आहे.  एका बाजूला दिवाळीचं वातावरण तर दुसऱ्या बाजूला निवडणुकीच वातावरण या दोन्ही उत्सवामध्ये कुठच्याही प्रकारचा अनिष्ट प्रकार घडू नये याची दक्षता शासन, पोलीस प्रशासन व उमेदवार घेतली पाहिजे व येऊ घातलेली निवडणूक निर्विघ्नपणे व आनंदाच्या वातावरणामध्ये पार पाण्यासाठी सर्वांनीच सहकार्य केले पाहिजे.

युवा पिढी, तरुण मंडळी,ज्येष्ठ नागरिक हे सर्व आपले मतदार राजा आहेत व हे मतदार राजा आपल्या उमेदवारांशी एकनिष्ठने व तळमळीने  खांद्याला खांदा लावून आपल्यासाठी प्रामाणिकपणे काम करत आहेत याचं भान ठेवून येत्या निवडणुकीत निवडून येणाऱ्या उमेदवाराने या आपल्या भोळ्या भाबड्या मतदार राजाच्या  शेवटपर्यंत अशीच काळजी घेऊन त्यांच्या विकासाचा, आरोग्याचा, शिक्षणाचा तसेच युवा पिढीच्या रोजगारांचा अवश्य विचार करावा असे एक मत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून रवी जाधव यांनी मांडले आहे.