शिंदे गटाचे उपविभागप्रमुख ठाकरे गटात

राणेंच्या घराणेशाहीला कंटाळूनच प्रवेश : प्रविण परब
Edited by: समीर सावंत
Published on: October 26, 2024 07:53 AM
views 554  views

मालवण : निलेश राणे यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे गटाला सोडचिठ्ठी देऊन आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. काल  मालवण तालुक्यातील श्रावण येथील शिंदे गटाचे आडवली-माडली विभागाचे उपविभागप्रमुख प्रविण परब यांनी निलेश राणे यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशाने नाराज होत  पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत मशाल हाती घेऊन प्रवेश केला आहे. आ.वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधुन त्यांचे पक्षात स्वागत केले आहे. 

   यावेळी बोलताना प्रवीण परब म्हणाले की जा निलेश राणेंनी बाळासाहेब ठाकरेंवर खालच्या पातळीचे आरोप केले त्यांनाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पक्षाचे तिकीट दिले हा बाळासाहेबांचा अपमान सहन न झाल्यामुळे आणि राणेंच्या घराणेशाहीला कंटाळून आपण शिवसेना  उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत असल्याचे सांगितले.

    याप्रसंगी आडवली-मालडी विभाग प्रमुख बंडू चव्हाण, अरुण लाड, पक्ष निरीक्षक रामू विखाळे, संजय पारकर, बाबा आंगणे, दुलाजी परब, कांता मुद्राळेसस्वप्निल दळवी, नितीन पवार, एकनाथ राऊत आदी शिवसैनिक उपस्थित होते