
देवगड : देवगड तालुक्यातील प्राथमिक शाळेतील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी देवगड तालुक्यातील केंद्रप्रमुख व प्र. शिक्षण विस्तार अधिकारी आनंद शिवराम राजम याची अतिरीक्त सत्र न्यायाधिश तथा विशेष न्यायाधिश श्रीमती एस. एस. जोशी यांनी सशर्थ जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपीच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरेपीविरूद्ध बीएनएस कलम ७५ (२) आणि बालकांचेलैंगिकअत्याचारापासून संरक्षण कायदा कलम ८, १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आरोपीला अटक केल्यानंतर तो न्ययालयीन कोठडीत होता. दरम्यान, त्याने जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने २५ हजार रुपयांचा जामिन मंजूर करताना पिडीतेशी संपर्क ठेऊ नये,साक्षीदारांवर दबाव आणू नये अशा अटी त्याच्यावरती घालण्यात आल्या आहेत.