प्रकाश परब यांच्या स्मृतीदिनानिमित्त रक्तदान शिबीर

Edited by: विनायक गांवस
Published on: October 24, 2024 14:26 PM
views 67  views

सावंतवाडी : स्वर्गीय प्रकाश परब यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त प्रकाश परब मित्रमंडळ तळवडे आणि ॲानकॅाल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमान स्वर्गीय प्रकाश परब संपर्क कार्यालयात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरामध्ये एकूण ३३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.त्यामध्ये महिला रक्तदात्यांसहित जास्तीत जास्त तरुण रक्तदात्यांचा सहभाग होता. यावेळी जेष्ठ रक्तदाते संजय पई यांनी तर आपले तब्बल ३५ वेळा रक्तदान केले.    

यावेळी प्रकाश परब मित्रमंडळ तळवडेचे गोडकर गुरुजी व घाडीसर,संजय पई,नारायण उर्फ राजू परब,सुरज परब, महेश परब,श्यामसुंदर मालवणकर,दिलीप मालवणकर,विलास नाईक, रविंद्र काजरेकर,विलास परब,रविंद्र सावंत,योगेश सावंत,दिनेश परब,विनोद वराडकर,आपा परब, काशिराम कुंभार, गौरव मेस्री, दत्तप्रसाद परब, बबन काळे, दिपक लोके,तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते तर ॲानकॅाल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग चे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त डीवायएसपी दयानंद गवस उपाध्यक्ष मिनल सावंत,सचिव बाबली गवंडे,कार्यकारिणी सदस्य सचिन कोंड्ये तात्काळ मदत करणारे रत्कदाते मंगेश माणगावकर व सुनिल गावडे उमा वराडकर प्रकाश वराडकर मळेवाड हायस्कुलचे मुख्याध्यापक साळसकर आदी उपस्थित होते.

यावेळी जनतेच्या हितासाठी कायम कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.तर ॲानकॅाल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग चे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त डिवायएसपी दयानंद गवस यांनी संस्थेच्या आजीवन सदस्य त्वाकरिता केलेल्या आवाहनाला अनुसरुन जवळपास १५ ते १६ सदस्यांनी रक्तदान शिबिराचे ठिकाणीच सदस्यत्व स्वीकारले. संजय पई यांनी तब्बल १०० सभासद करणारच असल्याचे यावेळी जाहीर केले. यावेळी सावंतवाडी रक्तपेढीच्या रक्तसंक्रमण अधिकारी डॅा.प्रज्ञा पाटील,रक्तपेढी सिस्टर प्राजक्ता रेडकर, मानसी बागेवाडी, तसेच रक्तपेढी सहाय्यक अनिल खाडे यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने रक्तसंकलन केले.