वायरमन मारहाण प्रकरण ; दोषींची निर्दोष मुक्तता

Edited by: विनायक गांवस
Published on: October 24, 2024 14:18 PM
views 155  views

सावंतवाडी : माडखोल फौजदार वाडी एम एस एबी सेक्शनचे लाईनमन लक्ष्मण आप्पा गावडे व त्यांचे  सहकर्मचारी हे थकित वीज बिलांच्या वसुलीसाठी गेलेले असताना त्यांना शिवीगाळ व मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सत्र न्यायाधीश देशमुख यांच्या न्यायालयात हा खटला चालला.

 

23 मार्च 2018 रोजी माडखोल येथील लाईनमन .लक्ष्मण आप्पा गावडे व त्यांचे सहकर्मचारी हे मार्च एंडिंग असल्याने थकित वीज बिलांची  वसुली करण्याकरीता माडखोल मधली वाडी येथे गेलेले असताना बंद घराच्या मीटरचे रीडिंग घेत असताना शेजारी राहणारे मनोज नामदेव राऊळ यांनी ''ये वायरमना इकडे आमचे गावात वसुलीसाठी फिरायचे नाही'' असे सांगून हाताच्या थापटाने  मारहाण करून ढकलून देवून शिवीगाळ केली  व शासकीय  कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला म्हणून फिर्यादी लाईनमन लक्ष्मण आप्पा गावडे यांनी सावंतवाडी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. या खटल्यात फिर्यादी पक्षाच्या वतीने एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. उपलब्ध पुराव्याचे कथन सरकार पक्षाच्या साक्षीदारांच्या पुराव्यातील विसंगत विधाने व कोणताही सबळ पुरावा उपलब्ध नसल्यामुळे आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे आरोपीच्या वतीने अँड.रत्नाकर गवस व अँड.राहुल मडगांवकर यांनी कामकाज पाहिले.