
चिपळूण : गुहागर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय संघटक संदेश मोहिते हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने गुहागर विधानसभा मतदारसंघात चुरस वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी महायुतीच्या नेत्यांकडे 12 विधानसभा निवडणूक लढवण्याची चर्चा केली आहे. त्यामध्ये गुहागर मतदार संघातून संदेश मोहिते हे विधानसभा लढविण्याचा खात्रीदायक माहिती मिळाली आहे. ना.रामदास आठवले यांचे निकटवर्ती असलेले संदेश मोहिते हे गुहागर विधानसभा मतदार संघातून लढण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. संदेश मोहिते यांचे काम खूप मोठे आहे. त्यांनी स्वर्गीय दयानंद फाउंडेशन च्या माध्यमातून अनेक सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक काम करत ग्रामीण भागात जनसंपर्क वाढवला आहे.
त्यांनी पक्षासाठी अहोरात्र काम केले आहे. यापूर्वी स्वर्गीय दयानंद मोहिते यांनी गुहागर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांना लाखो मतदाराने मतदान केले होते. या मतदार संघातून श्री. मोहिते यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळाली तर विजय निश्चित आहे. काही महिन्या पासून संदेश मोहिते हे गुहागर मतदारसंघात गाठी-भेटी घेत आहेत. ना. रामदास आठवले यांच्या प्रयत्नातून समस्या सोडवण्याचे आश्वासन ते देत आहेत. विधानसभा निवडणुका 20 नोव्हेंबर रोजी होणार असून त्यासाठी श्री. मोहिते यांना उमेदवारी मिळावी याबाबत ग्रामस्थ व कार्यकर्ते मागणी करत आहेत. संदेश मोहिते यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाकडून संधी मिळाली तर पिण्याचा पाण्याचा प्रश्न, विज लोडिंगचा प्रश्न, रेल्वे ट्रॅक तसेच चिपळूण मध्ये एअरपोर्टची मागणी, यूपीएससी व एमपीएससी मार्गदर्शन वर्ग, मुंबई गोवा बुलेट ट्रेन, मुंबई गोवा मेट्रो ट्रेन, सिमेंट काँक्रीटचे रस्ते, पायलट प्रशिक्षण, गरीब मुलांना मोफत शिक्षण, अत्याधुनिक रुग्णवाहिका , आय,आय,बी, एमबीए आणि इंजिनिअरिंग कॉलेजेस, पर्यटन विकास, महिला सक्षम गृह उद्योग इत्यादी विकास कामाचा आराखडा तयार केलेला आहे. संधी मिळाल्यास आपण क्रांती घडवू असे त्यांनी सांगितले.
एमआयडीसी आणण्याचा प्रयत्न करू तसेच बेरोजगार तरुणांना नोकरी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. जे प्रकल्प बंद आहेत ते पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करू असेही सांगितले. गुहागर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी परदेशातून पर्यटक फिरायला येतात. मात्र त्यांना जास्तीत जास्त सुविधा मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येईल. त्यामुळे आता गुहागर विधानसभा मतदारसंघात निश्चित रंगतदार लढत होणार असे बोलले जात आहे