
चिपळूण : ब्राह्मण सहाय्यक संघ, चिपळूण या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वा. कै. बाळाजी नारायण चितळे नगरमधील संघाच्या पहिल्या मजल्यावर डायनिंग हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे.
या सभेमध्ये मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, संस्थेच्या १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या आर्थिक वर्षाचा अहवाल व या कालावधीची संस्थेचे लेखापाल यांच्याकडून तपासणी होऊन आलेली उत्पन्न व खर्च पत्रके, ताळेबंद व २०२४-२५ साठीचे अंदाज पत्रक यांना मंजुरी घेणे, संस्थेच्या सभासदांकडून आलेली निवेदने व सूचना यांचा विचार करणे, अध्यक्षांच्या अनुमतीने आयत्या वेळी येणाऱ्या कामांचा विचार करणे, अध्यक्षांचे मनोगत, आभार प्रदर्शन होईल, असे कार्यवाह रमेश चितळे, कार्याध्यक्ष डॉ. जयंत मेहेंदळे यांनी कळवले आहे.