राजघराण्याला कार्यकर्त्यांच्या निवडणूकीत उतरवल !

प्रजा विरूद्ध राजा असं चित्र: निलेश राणे
Edited by: विनायक गावस
Published on: November 27, 2025 10:34 AM
views 40  views

जनतेच प्रेम संजू परबांना विजयी करेल : दीपक केसरकर 

सावंतवाडी : आमिष दाखवून पराभूत करण्याच काम होत असल तरी जनतेच प्रेम संजू परब यांना विजयी करेल, असा विश्वास माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. तर राजघराण्याला कार्यकर्त्यांच्या निवडणूकीत उतरवून प्रजा विरूद्ध राजा असं चित्र निर्माण केल्याची टीका शिवसेना आमदार निलेश राणेंनी केलं. प्रभाग क्रमांक ७ मधील कॉर्नर बैठकीत ते बोलत होते. 


श्री. केसरकर पुढे म्हणाले, पक्षाला गरज असताना संजू परब मैदानात उतरले आहेत. त्यामुळे फक्त तुमची साथ हवी आहे. त्यांच्या प्रचार सभेला मी येणार नाही असं होणार नाही. सौ. संजना परब यांनी इथे नातं जपलं आहे. त्यामुळे आमिषाला जनता बळी पडणार नाही. सावंतवाडीला आरोग्य सुविधांची आवश्यकता आहे. त्यासाठी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणलं. मात्र, सह्या न झाल्याने तो प्रकल्प रखडला. कोट्यवधीची जमीन राजघराण्याला सरकार देत होतं. फुकट जागा आम्ही मागीतली नाही. तलाव सुद्धा आमच्या मालकीचा म्हणनं योग्य नाही. तलाव हे सावंतवाडीच नाक आहे. सध्या आजारपणामुळे मला फिरता येत नाही. याचा गैरफायदा घेऊन गैरसमज पसरवले जातायत. मात्र, आमचं पॅनल निवडणूकीत उभ आहे‌. मला चार वेळा आशीर्वाद दिलात‌ तसाच आशीर्वाद शिवसेनेच्या २१ जणांना द्या असे आवाहन त्यांनी केले. भाजी मंडई, अंडर ग्राउंड पार्किंग, पर्यटन केंद्र, सुसज्ज कॉम्प्लेक्स, मटण मार्केट आदी उभी राहत आहेत. २४ तास पाण्यासाठी ५७ कोटींची नळपाणी योजना मंजुर होऊन काम सुरू आहे. त्यामुळे तुमची सेवा करण्यासाठी संजू परब, स्नेहा नाईक यांसह नगराध्यक्षांना विजयी करा असे आवाहन केसरकर यांनी केलं. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना चांगलं बोलता येत त्या तुमची चांगली सेवा करतील. विजयी मिरवणूक सहभागी होण्यासाठी मी स्वतः येईन असं आवाहन केलं. 

सावंतवाडी शहर फक्त केसरकर जपू शकतात : निलेश राणे

आमदार निलेश राणे म्हणाले, संजू परब यांचा विजय निश्चित झाला आहे. नगराध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं काम जवळून बघितल आहे. राणे कुटुंबाची सावली म्हणून ते राहिलेत‌. युतीसाठी दीपक केसरकर, उदय सामंत आणि मी खूप प्रयत्न केले. मात्र, युती झाली नाही. संजू परबांमुळे जिल्ह्यातील रेटही वाढला. म्हणून, मला स्टिंग ऑपरेशन करावे लागत. रेट कितीही वाढला तरी संजू परब यांचा विजय निश्चित आहे. त्यात त्यांच्या सौभाग्यवतींचा वाटा मोठा असणार आहे. दीपक केसरकर व मी तुझ्यासोबत आहोत. पैसे येतील अन् जातील पण गेलेली इज्जत परत येणार नाही हे स्व. बाळासाहेब ठाकरेंच वाक्य आहे असं मत व्यक्त केले. तसेच राजघराण्याचा आम्हालाही आदर आहे. पण, संजू परब मुद्यावर बोलत आहे. मोती तलाव गेला तर बसायचं कुठे ? अधिक बोलणार नाही. पण, निलेश राणे संजू परब यांच्या सोबत आहे. नारायण राणेंवर टीका करणारा माणूस बाहेरून येऊन पैसे वाटतोय. वाटप होणारे पैसे येतात कुठून ? हा प्रश्न आहे. त्यामुळे कितीही काही झालं तर ॲड. निता सावंत-कविटकर नगराध्यक्ष होणार असा विश्वास आ. राणेंनी व्यक्त केला. ज्यांनी आमदार, खासदार व्हायचं ते कार्यकर्त्यांची निवडणूक लढवत आहेत. प्रजा विरूद्ध राजा असं सावंतवाडीच चित्र झालं आहे असाही टोला हाणला. आ. केसरकर यांच्यात निधी खेचून आणण्याची ताकद आहे. मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडीत भगवा फडकवायचा आहे. २१-० होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. सावंतवाडी शहर फक्त दीपक केसरकर जपू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

आमिषाला बळी पडू नका, दोन तारीख नंतर तुमच्यासोबत रात्री अपरात्री संजू परब असणार, बाकी कुणी नसणार आहेत. खरं बोलतो म्हणून मला पाडायचं आहे. पण, ही लोकं मला पाडणार नाही. काहीही करतील पण मत मला घालतील असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी व्यक्त केला. पैशाच्या विरोधातील ही लढाई आहे. कामाला मत द्या, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हाप्रमुख तथा उमेदवार संजू परब यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, याच प्रभागात लहानाचा मोठा झालो. पुढे जाणाऱ्याला रोखायचे, अस्तित्व नष्ट करण्यासाठी मला पराभूत करायचं आहे. पैसे वाटून संपवायचा डाव आहे. पण, ही लोक माझ्यासोबत आहेत. मी नगराध्यक्ष म्हणून दोन वर्ष काम केल. राजघराण्यातील व्यक्ती नगराध्यक्ष झाल्यास मोती तलाव हातातून कशावरून जाणार नाही ? मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा विषय आहे. गाडे वाल्यांकडून भाडी वसूल केली जातात. बाजारपेठील नाथ पै सभागृहासमोरील दुकानदारांना नोटीसा गेलेल्या आहेत. तुमच्या समस्या आमच्याकडे बिनधास्त बोलू शकता. इथला समोरचा उमेदवार पैशाचा जीवावर मला तळ्यात विसर्जन करायची वल्गना करतो. मी कोरोनातही काम केलं. लोकांची सेवा देखील करतोय. आता भाषण करणारे तेव्हा कुणीही नव्हते. नगराध्यक्ष असताना विकासकामांचे ठराव घेतले. त्यामुळे पैशाला मत देऊ नका, कामाला मत द्या, माणूसकीला जागा असे आवाहन केलं. यावेळी भाजपचे माजी नगरसेवक गुरू मठकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, संपर्क प्रमुख राजेश मोरे, आनंद शिरवलकर, महिला जिल्हाप्रमुख तथा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड. निता कविटकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, भारती मोरे, सौ. संजना परब, उमाकांत वारंग, अनारोजीन लोबो, दिपाली सावंत, शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, अजय गोंदावळे, देव्या सूर्याजी, सुरेंद्र बांदेकर, उत्कर्षा सासोलकर, गोविंद वाडकर, वैभव म्हापसेकर, परिक्षीत मांजरेकर, बंड्या कोरगावकर, स्नेहा नाईक, हर्षा जाधव, बासित पडवेकर, संजना पेडणेकर, प्रसाद नाईक, वेदिका सावंत, पुजा आरवारी आदींसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

२१-० करून दाखवा : ॲड निता सावंत-कविटकर

 नगराध्यक्षपदासाठी मी उभी आहे. २० उमेदवार माझ्यासोबत आहे. त्यामुळे २१-० आपल्याला करायचं आहे. प्रभाग ७ मध्ये संजू परब यांना घेरण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांच्यामागे आपल्याला उभं राहायच आहे. इथे सर्वजण गुण्यागोविंदाने नांदतात. माझ्या विरोधात उभ्या असलेल्या व्यक्ती यापूर्वी तुमच्या घरी आलेल्या का ? सावंतवाडी ही राजघराण्याची होती. येथील जमीनी संस्थानच्या असल्याचा दावा कोर्टात आहे. या जमीनीची ताबा मिळावा, नुकसानभरपाई मिळावी म्हणून याचिका आहे. त्यामुळे सावंतवाडी सुरक्षीत ठेवायची असेल तर याचा विचारा व्हावा. आमिषांना बळी पडू नका असे आवाहन त्यांनी केले