
मालवण : शहरातील चिवला बीच येथील फातीमा देवीची मूर्ती अज्ञात व्यक्तीने देव्हाऱ्यातून काढून बाजूला ठेवल्याची घटना घडली आहे. धुरीवाडा, चिवला बीच येथील नागरिकांनी आणि ख्रिस्ती बांधवांनी या घटनेचा निषेध नोंदविला आहे. तसेच सखोल तपास करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान , पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे. खिस्ती बांधवांनी फातीमा देवीची मूर्ती पुन्हा प्रार्थना करत धर्मगुरू यांच्या उपस्थितीत देव्हाऱ्यात बसविली.










