
सावंतवाडी : बांदा येथील आत्महत्या केलेल्या युवकाच्या प्रकरणात संशयित आरोपींना तात्काळ अटक करावे. पोलिसांना बारा तास मुदत देत आहोत. बारा तासाच्या आत संबंधितांना अटक न झाल्यास बांदा पोलीस ठाण्याला धडक देणार असल्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी दिला आहे.
बांदा येथील फुलवेक्रेता युवक आफताब शेख यांनी आज आत्महत्या केली. मात्र आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. या व्हिडिओत त्यांनी आपण का आत्महत्या करत आहोत? आणि आपल्याला आत्महत्या करण्यासाठी कोणी आपला छळ केला?, याबाबत खुलासा केला आहे. या घटनेची तात्काळ दखल पोलिसांनी घ्यावी. बारा तासाच्या आत संबंधित संशयीतांवर गुन्हा दाखल करून अटक न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी दिला आहे.











