
सावंतवाडी : माजगाव कासारवाडा येथील भास्कर धर्माजी कासार वय (69) यांचे बुधवारी मध्यरात्री उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे उपचार सुरू असताना निधन झाले. गणपती विसर्जनानंतर जेवण वगैरे अंगणातून घरात जात असताना चक्कर येऊन ते पडले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरू असतानाच रात्री सव्वा एक वाजता त्यांचे निधन झाले.
या संदर्भात नातेवाईक मिलिंद कासार यांनी दिलेल्या माहितीवरून सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे याबाबत अधिक तपास पोलिस हवालदार मनोज राऊत करीत आहेत. माजगाव येथील कासार समाजाचे ते माजी अध्यक्ष होते, भाईसाहेब सावंत महाविद्यालय माजगाव तर कासारवाडा समाज संस्था माजगावचे ते विद्यमान अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी,जावई ,सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.