वैभववाडीतील वाहतूक तासाभरानंतर सुरळीत

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 13, 2025 23:02 PM
views 175  views

वैभववाडी : ट्रक रुतल्याने तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर वैभववाडी येथे ठप्प झालेली वाहतूक तासाभराने सुरळीत झाली. वाहनचालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

   शहरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्त्याच काम सुरू आहे. हे काम करण्यासाठी सध्या येथून एकेरी वाहतूक सुरू आहे. यामुळे नेहमी वाहतूक कोंडी  होत आहे.आज सायंकाळी अर्जुन रावराणे विद्यालयासमोर तळेरेच्या दिशेने जाणारा माल वाहतूक ट्रक समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देत असताना मातीत रुतला. यामुळे या मार्ग वाहतूक ठप्प झाली. दोन्ही बाजूंनी २किमी पर्यंत रांगा लागल्या होत्या.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल,अजय बिल्पे, श्री.राणे यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मातीत रुतलेल्या ट्रकला बाजूला करून मार्ग खुला केला. तासाभर अनेक वाहने या मार्गावर अडकली होती. त्यामुळे एका बाजूला एडगावपर्यंत तर दुस-या बाजूला बसस्थानकात पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ट्रकला बाजूला केल्यानंतर ही वाहतूक सुरळीत झाली.