
सावंतवाडी : 1 जून 2025 रोजी 'हेलन केलर' याच्या जन्मदिनानिमित्त नॅब नेत्र रुग्णालय, भटवाडी सावंतवाडीच्या वरच्या मजल्यावरील नॅब सभागृहामध्ये दिव्यांगासाठी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाला सुरूवात होईल. कार्यक्रम संपल्यानंतर भोजनाची व्यवस्था केलेली आहे. दिव्यांगाना येण्या जाण्याचा प्रवास खर्च देण्यात येईल. तरी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त दिव्यांगानी उपस्थित रहावे असे आवाहन नॅब सिंधुदुर्गचे अध्यक्ष, सचिव व खजिनदार यानी केले आहे.