
दोडामार्ग : तिलारी घाटातील अवघड वळणावर आरसे बसविण्यात आले आहेत. तेथे आरसे बसवावेत अशी मागणी स्वराज्य सरपंच सेवा संघ जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी केली होती. या मागणीला यश आले आहे.
तिलारी घाटातून एस. टी. वाहतूक सुरु करण्याबाबत सतत पत्र व्यवहार व पाठपुरावा सुरु असून परिवहन महामंडळाच्या सर्वे नुसार अनेक ठिकाणी ब्लाईंड स्पॉट आहेत. त्या ब्लाईंड स्पॉट वर आरसे बसवण्या संदर्भात परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी चंदगड सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्यांना सुचविले होते. आवश्यक ठिकाणी तात्काळ आरसे बसवण्याची मागणी स्वराज्य सरपंच सेवा संघ जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी चंदगड सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे केली होती. या मागणीला योग आले असूनr घाटातील ब्लाईंड स्पाॅटवर आरसे बसविण्यात आले आहेत.