
वैभववाडी : महावितरणच्या एप्रिल महिन्यातील लकी ग्राहक स्पर्धेचे विजेते कोळपे येथील दिनकर रामचंद्र पाटणकर हे ठरले. त्यांना स्मार्ट वॉच देऊन गौरविण्यात आले.
महावितरणने ऑनलाईन वीज बील भरणा करण्या-या ग्राहकांसाठी 'लकी डिजिटल ग्राहक योजना'आणली आहे. ही योजना एप्रिल ते जून या तीन महीन्यासाठी आहे. या योजनेअंतर्गत विजेत्यांना 3 स्मार्ट फोन व दोन स्मार्ट वॉच देण्यात येणार आहेत. एप्रिल महीन्यातील बक्षीसाचे मानकरी श्री पाटणकर हे ठरले. वैभववाडी उपविभागाचे उप कार्यकारी अभियंता कुमार चव्हाण साहेब यांच्या हस्ते श्री पाटणकर यांना हे बक्षीस देण्यात आले आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीने वीज बील भरणा करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री चव्हाण यांनी केले. यावेळी महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते.