
वैभववाडी : भाजपचे भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांची सडुरे शिराळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर त्यांचं सर्वांनी अभिनंदन केले.
सडुरे-शिराळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद हे रिक्त झालं होतं. त्याकरिता निवडणूक जाहीर झाली होती.या पदासाठी श्री.काळे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी सरपंच दिपक चव्हाण, माजी सरपंच विजय रावराणे, ग्रामसेवक प्रशांत जाधव यासह ग्रामपंचायत सदस्य, व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.