
देवगड : माता मृत्यू आणि बाल मृत्यूना आळा घालणाऱ्या, उन्ह - वारा अन् पावसाची तमा न बाळगता डोंगरदऱ्यांसह सर्वत्र घरोघरी पायी फिरून गरोदर मातांची काळजी घेणाऱ्या आशा स्वयंसेविका म्हणजे आबोली साडीतील देवदूतच. अशा या आशांचे कौतुक करण्यासाठी "आशा दिन' म्हणून साजरा केला जात आहे .शासनाने त्यांच्यावर महत्त्वाची कामे सोपविली आहेत. प्रसूती, आरोग्याबाबतची अनास्था, समाजात होणारे माता आणि बालमृत्यूचे प्रमाण तसे मोठे होते. ते रोखणे आदी महत्त्वाची कामे आशा सेविका यांच्यावर शासनाने सोपविले आहेत. ती कामे तत्परतेने आशा करत असल्याने त्यांचा गौरव व्हावा या दृष्टीने हा आशा दिन महत्त्वाचा दिवस असल्याचे प्रतिपादन तालुका आरोग्य अधिकारी डॉ . उमेश पाटील यांनी व्यक्त केला.
श्री. स्वामी समर्थ सभागृहात आशा दिवस गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश पाटील व रोटरी क्लब मँगो सिटी देवगड अध्यक्ष मनस्वी घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आले.
यावेळी व्यासपिठावर रोटरी क्लब मँगो सिटी देवगड अध्यक्ष मनस्वी घारे, आरोग्य विस्तार अधिकारी प्रतिमा वळंजु, जिल्हा समन्वयक वृषाली चेंदवणकर, DCM गोरख राठोड, आरोग्य कर्मचारी मदन मसके, बाबुराव वरक, स्वप्निल झोरे, सागर जाधव, विनायक सांगळे, पाककला परीक्षक श्रृती पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
जीवनात महत्वाचा घटक म्हणजे आरोग्य असून आशा म्हणजे आरोग्याचा कणा असून आशांनी आपल्या कामातून आरोग्य विभागात आपली वेगळी ओळख निर्माण केली असुन आशा स्वयंसेविका शासनाच्या सर्व योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोचविण्याचे महत्वाचे काम करत असून नागरिक आणि शासनामधील त्या महत्त्वाचा दुवा ठरल्या आहेत. अशा या आशा स्वयंसेविकांनी कोविडच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालुन सेवा बजावली आहे, ही बाब कौतुकास्पद असल्याचे मत गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांनी व्यक्त केले.
यावेळी रोटरी क्लब मँगो सिटी देवगड अध्यक्ष मनस्वी घारे, जिल्हा समन्वयक वृषाली चेंदवणकर , आरोग्य विस्तार अधिकारी प्रतिमा वळंजु, आशा स्वंयसेविका स्वाती गांवकर, गटप्रवर्तक साक्षी खानविलकर यांनी मनोगत व्यक्त करत आशां स्वयंसेविकांना शुभेच्छा दिल्या.
यानंतर आरोग्य विषयक क्षेत्रात उत्तम कामगिरी करून माहे एप्रिल २०२५ ते माहे फेब्रुवारी २०२५ या अकरा महीनाच्या कालावधीत उत्कृष्ट कामासोबतच राष्ट्रीय कल्याण कार्यक्रमात मोलाचे कार्य केलेल्या आशां स्वंयसेविकांचा सन्मान करण्यात आला त्यामध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक आशा स्वयंसेविका अंकिता अरविंद कुळकर ( प्रा .आरोग्य केंद्र पडेल ) यांनी सात कुटुंब शस्त्रक्रिया प्रवृत्त केले, तर द्वितीय क्रमांक आशा स्वयंसेविका निलिमा नागेश सारंग (इळये प्रा .आरोग्य केंद्र ) यांनी तीन कुटुंब शस्त्रक्रिया प्रवृत्त केले तर तृतीय क्रमांक आशा स्वंयसेविका समिक्षा संतोष पेडणेकर ( उपकेंद्र सौंदाळे गाव वाडाकेरपोई ) यांनी तीन कुटुंब शस्त्रक्रिया प्रवृत्त केले तर गटप्रवर्तकांमध्ये प्रथम क्रमांक गटप्रवर्तक साक्षी गणेश खानविलकर ( प्रा .आ .केंद्र पडेल ) यांनी २१ शस्त्रक्रिया प्रवृत्त केले. या विजेत्या आशा स्वंयसेविकांचा व गटप्रवर्तकांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तु व, सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
तसेच आशाच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . तसेच पाककला स्पधेचे आयोजन करण्यात आले होते या पाककलेचे खास वैशिष्टे म्हणजे बालके सुदृढ व्हावीत यासाठी डॉ . उमेश पाटील यांच्या संकल्पनेतुन लहान मुलांसाठी पपई , अळु , नारळ व शेंगदाणे या स्थानिक उपलब्ध असणाऱ्या पदार्थापासुन बनवलेल पौष्टीक पदार्थ ही या वर्षीची थिम निवडण्यात आली* त्याला आशा सेविकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला . या पाककलेचे परीक्षक म्हणून श्रृती पाटणकर व रोटरी क्लब मँगो सिटी देवगड अध्यक्षा मनस्वी घारे यांनी परीक्षण केले . यामध्ये प्रथम क्रमांक सानिया सुहास नारकर( विठ्ठलादेवी) द्वितीय क्रमांक रेणुका रमेश गोठणकर ( पडेल ) तर तृतीय क्रमांक महिमा महेश कोळंबकर ( मिठबांव ) यांनी पटकावला या विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तु व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ललुका समुह संघटक स्वप्निल झोरे, तर आभार बाबुराव वरक यांनी मानले.