
दोडामार्ग : दोडामार्ग तालुका उबाठा शिवसेनेच्यावतीने तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या उपस्थितीत दोडामार्ग येथील संपर्क कार्यालयात छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख संजय गवस, पदाधिकारी भिवा गवस, मिलिंद नाईक आदी उपस्थित होते.