फणसगाव विठ्ठलादेवी इथं गुणवंत महिलांचा सत्कार

Edited by:
Published on: March 17, 2025 18:07 PM
views 15  views

कणकवली : फणसगाव - विठ्ठलादेवी गावातील गुणवंत महिलांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या गुणवत्तेचा अधिक विकास व्हावा यासाठी सामाजिक कार्यकर्त्या तसेच विविध बचत गटांच्या मुख्य मार्गदर्शक अलका विलास नारकर यांच्या पुढाकाराने गावातील गुणवंत महिलांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. समाजातील महिलांना सन्मानाने वागणूक मिळाली तर महिला अधिक प्रगती करतील असे प्रतिपादन या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ.ढवळे यांनी केले.

अलका नारकर यांच्या अध्यक्षतेखाली  वर्धमान, वर्धन, विरांगना, वरदायिनी या चार बचत गटांतर्फे हा महिलांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी गावच्या सरपंच ज्योती प्रदिप नारकर, चद्रकला चद्रकात नारकर, स्त्री विश्व संघटनेच्या संस्थापक सायली शिवानंद नारकर, अनिता सदानंद नारकर, पोलीस भरती परीक्षेत पास झालेल्या प्रतिक्षा खुळेता या विशेष गुणवत्ता सिद्ध केलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला.

    यावेळी बोलताना अलका नारकर म्हणाल्या, महिलांचे प्रश्न महिलांनी सोडवायला हवे यासाठी बचत गट हे महत्त्वाचे माध्यम आहे. मी याचाच विचार करू गावात बचत गट सुरू होण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले आणि तुम्हा सगळ्या भगिनींमुळे ते प्रयत्न यशस्वी झाले.त्यामुळेच या बचत गटांतर्फे महिलांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. 

    सायली नारकर म्हणाल्या की अलका नारकर यांनी जसे सर्व महीलाना एकत्र जोडुन बचत गट चालवलेत तसेच तुम्ही सर्वांनी आपापले गट सभाळा.आपल्या सिधुदुर्गात अशा अलका नारकर या एकमेव आहेत ज्यानी चार बचत गट सुरू केले. अलकाताईंच्या पुढाकाराने हा सत्कार सोहळा पार पडलाआहे. हा गावातील एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. .तसेच त्या  स्त्री विश्व एकल महीला संस्थेच्या त्या अध्यक्ष आहेत. जन शिक्षण सस्था सिधुदुर्ग कार्यकारणी सदस्या आहेत तसेच विठ्ठलादेवी ज्ञानवर्धिनी सार्वजनिक वाचनालय विठ्ठलादेवी सचिव आहेत. अलकाताई यानी 25 वर्षा पुर्वी एक बचत गट सुरू केला. आता त्याचे एकुन चार बचत गट  आहेत.अलकाताई स्व मालकीच्या इमरतीत वाचनालय चालवतात. तसेच महीला बचत गटाच्या मिटीग, स्त्री विश्व एकल महीला संघटना याच्या ही मिटीग याच्याच इमारतीत होतात. तसेच महीलाना रोजगाराची सधी उपलब्ध होण्यासाठी जनशिक्षण व बँक ऑफ इंडिया मार्फत प्रक्षिक्षण देतात.