
वेंगुर्ला : विठ्ठल पंचायतन देवस्थान खानोली सुरंगपाणी या देवस्थानचा देवता स्थापना दिन सोहळा सोमवार दिनांक १० मार्च व मंगळवार दिनांक ११ मार्च रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दिनांक १० मार्च रोजी सकाळी ७ वाजता नित्यपूजा, ९ वाजता आवळीवृक्ष पूजन, दुपारी १ वाजता आरती, तीर्थप्रसाद व स्नेहभोजन, सायंकाळी ५ वाजता स्थानिक भजने, सायंकाळी ६.३० वाजता धुपारती, पालखी प्रदक्षिणा व ७ वाजता श्री दत्त माऊली दशावतार लोककला नाट्य मंडळ सिंधुदुर्ग यांचा मित्र प्रेम हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
मंगळवार दिनांक ११ मार्च रोजी सकाळी ७ वाजता नित्यपूजा, १० वाजता सत्यनारायण महापूजा, आरती, पालखी प्रदक्षिणा, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता स्थानिक भजने, सायंकाळी ७ वाजता ओमकार दशावतार नाट्य मंडळ म्हापण यांचा "नागा तपस्वी अर्थात कुंभमेळा" हा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री विठ्ठल पंचायतन देवस्थान खानोली सुरंगपाणी चे संस्थापक प. पू. दादा पंडित महाराज यांनी केले आहे.