
दोडामार्ग : ग्रुप ग्रामपंचायत केर - भेकुर्ली मधील भेकुर्ली हा गाव दुर्गम भागात येतो. येथील ग्रामस्थांनी एक वर्षापूर्वी आमच्या गावासाठी केवळ पाण्यासाठी काम करा अशी मागणी केली होती त्या अनुषंगाने ग्रामपंचायतने बंधारा नियोजन बैठक गावांत घेतली होती महत्वाचे म्हणेज एक वर्षाच्या आत मातीनाला बांध आणि सिमेंटनाला बांधला मान्यताही मिळाली या कामाची पाहणी करण्यासाठी ग्रामपंचायत आणि सत्ताधारी शिवसेना पदाधिकारी यांनी संयुक्त दौरा केला. यावेळी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, कुडासे विभाग प्रमुख रामदास मेस्त्री, उपतालुकाप्रमुख दादा देसाई, तालुका संघटक गोपाळ गवस, युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस, उपसरपंच तेजस देसाई, ग्रामपंचायत सदस्य निलेश देसाई, भेकुर्ली ग्रामस्थ रघुनाथ देसाई, देऊ देसाई, बाळा देसाई, कृष्णा जाधव, संदीप देसाई, सखाराम देसाई, विनायक देसाई, गंगाराम देसाई, ठेकेदार शिवानंद देसाई आदीसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
...तर पाण्याचे दुर्भीक्ष टळेल
भेकुर्ली हा गाव समुद्र सपाटीपासून उंचीवर येतो. येथे पाणीसाठा एप्रिल पासून संपूष्टात येतो. सदर मातीनाला बांध येथे सध्या पाणी दिसत आहे. पावसाच्या पाण्याचा योग्य साठा झाल्यास भविष्यात पाणी पातळी वाढून पाणी टंचाई दूर होऊ शकते. तसेच भेकुर्ली गणपती विसर्जन स्थळ येथील ओहळावरही सिमेंट नाला बांध मंजूर असून त्याचे कामही लवकर होणार आहे. कृषि अधिकारी यांच्या सर्व्हेक्षणानंतर खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दिपक केसरकर यांच्या सहकार्यातुन जिल्हा वार्षिक नियोजन विभागाच्या योजनेतुन दोन्ही बंधाऱ्याना निधी मंजूर झाला. त्याचबरोबर गावातील अंतर्गत रस्त्यासाठी आमदार दिपक केसरकर यांच्या आमदार निधीतून गावठण ते दलित वस्ती, जन सुविधा मधून तसेच तांडा वस्ती योजनेतून रस्त्यासाठीही विशेष निधी देण्यात आला त्यामुळे ग्रामपंचायतकडून शासनाचे आभार मानण्यात आले.